ETV Bharat / city

Ashadhi Ekadashi 2022: वारीच्या महासागरात पावसाने केले भाविकांचे हाल; राहुट्यात घेतला आसरा - Pandharpur Wari

पंढरपूरमध्ये भक्तीचा महापूर वाहू लागला आहे. पंढरपूरात ही गर्दी वाढत असतानाच पावसामुळे मात्र, या सर्व भाविकांचे ( devotees ) मोठे हाल होत आहे. दिवसभर पावसाची ( rain ) रिपरिप सुरू असल्यामुळे या भाविकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत.

वारीत भाविकांचे हाल
वारीत भाविकांचे हाल
author img

By

Published : Jul 10, 2022, 6:52 AM IST

Updated : Jul 10, 2022, 9:38 AM IST

सोलापूर - पंढरपूरमध्ये ( Pandharpur ) आषाढी एकादशीच्या ( Ashadhi Ekadashi ) सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. साजरा होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यास राज्याच्या ( state ) कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. पंढरपूरमध्ये भक्तीचा महापूर वाहू लागला आहे. काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वाखरी येथील रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर, मानाच्या सर्व पालख्या या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. तेव्हा पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. पंढरपूरात ही गर्दी वाढत असतानाच पावसामुळे मात्र, या सर्व भाविकांचे ( devotees ) मोठे हाल होत आहे. पंढरपूरमध्ये अनेक ठिकाणी या भाविकांनी आपल्या राहूट्या उभ्या केल्या आहेत. राहुट्याचा आधार घेत वारकरी विठ्ठलाचे दर्शन ( Vitthal Darshan ) घेण्यासाठी आतुर झाले आहेत.

रात्र बसून काढली- शनिवारी दिवसभर पावसाची ( rain ) रिपरिप सुरू असल्यामुळे या भाविकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. सलग 21 दिवस हे भाविक दिंड्यांबरोबर चालत असतानाच अगदी दमून जात असतात. या सर्व वारकऱ्यांचा ( Varakari ) मुक्काम शनिवारी पंढरपूरमध्ये होते. परंतु, पावसाच्या रिपरिपमुळे विठ्ठल भक्तांचे मोठे हाल झाले आहेत. भाविकांनी त्यांच्या राहूट्या उभ्या केल्या आहेत. त्यामध्ये पाणी शिरले आहे. पाऊसामुळे सर्वत्र चिखल झाल्यामुळे अनेक भाविकांना संपूर्ण रात्र ही बसूनच काढावी लागली आहे.

आषाढ वारीला पंढरपूरात मुसळधार पाऊस होणार; हवामान तज्ञांचा इशारा- हवामानातज्ञ पंजाब डंक यांनी 10 जुलै रोजी आषाढ एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. 2 वर्षानंतर आषाढ वारी होत आहे. महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातुन जवळपास 15 लाख भाविक दाखल झाले आहेत. 2 दिवसांपासून पावसाची दिवसभर रिपरिप सुरू असल्याने विठ्ठल भक्तांची मात्र मोठी पंचायत झाली आहे.

वारकऱ्यांची पंढरीत लगबग - आळंदी आणि देहू वरून निघालेले लाखो वारकरी आता पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. वारकरी आता चंद्रभागेमध्ये स्नान करून पुढे नामदेव पायरीच दर्शन घेत आहेत. विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये घेऊन हे वारकरी चालत पंढरपूर पर्यंत पोहोचले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा - आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी शनिवारी रात्री मुख्यमंत्र्यांचे पंढरपुरात आगमन होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. रविवारी पहाटे 2.30 ते 4.30 श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होईल. त्यानंतर पहाटे 5.30 विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन, पहाटे 5.45 ला नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती लावतील.

विठ्ठल-रुक्मिणीला एक कोटींचा मुकुट - दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडानंतर पंढरी मध्ये आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. यावर्षी आषाढी एकादशी साठी प्रशासनांना जोरदार तयारी केली असून तब्बल 15 लाख भाविक दाखल होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. दरम्यान, श्री विठ्ठल-रुक्मिणीला तब्बल अडीच किलो वजनाचे एक कोटी रुपयांचे सोन्याचे मुखवट भेट म्हणून देण्यात आले. आषाढी एकादशीच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील भाविक विजयकुमार उत्तरवार हे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला सोन्याची मुकुट भेट देणार आहेत. विजयकुमार उत्तरवार हे उमरी येथील सोने चांदीचे व्यापारी आहेत. यापूर्वी अनेक भाविक भक्तांकडून विठ्ठलाला मोठ्या प्रमाणावर विविध आभूषने, अलंकार, दागिने देण्यात आले आहे. आता या विठ्ठलाच्या दागिन्यांमध्ये एक कोटी रुपयांच्या सोन्याच्या मुकुटाची भर पडली आहे.

हेही वाचा - Ashadhi Ekadashi 2022 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरी सजली; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा

Last Updated : Jul 10, 2022, 9:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.