ETV Bharat / city

Gudipadwa 2022 : गुडीपाडव्याला नागरिकांनी सामाजिक संकल्प करावा : पंचांगकर्ते ओंकार दाते - चैत्र महिना

सोलापुरातील पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी आवाहन केले आहे की, यंदाच्या गुडी पाडव्याला नागरिकांनी सामाजिक संकल्प करावा. जेणेकरून समाजाला याचा फायदा व्हावा. गुडीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करावयाची असल्यास अनेक नागरिक गुडी पाडव्याला त्याची सुरुवात करतात.

Gudipadwa 2022
Gudipadwa 2022
author img

By

Published : Apr 1, 2022, 12:41 PM IST

सोलापूर - गुडीपाडवा हा वसंत ऋतूचा सण आहे. हिंदू कॅलेंडरच्या चंद्र सौलर पध्दतीनुसार नवीन वर्षाची सुरुवात म्हणून चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुडीपाडवा साजरा केला जातो. दरवर्षी या सणाला भारतातील नागरिक आपल्या आयुष्यातील पुढील वर्षाचा संकल्प करतात. सोलापुरातील पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी आवाहन केले आहे की, यंदाच्या गुडी पाडव्याला नागरिकांनी सामाजिक संकल्प करावा. जेणेकरून समाजाला याचा फायदा व्हावा. गुडीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करावयाची असल्यास अनेक नागरिक गुडी पाडव्याला त्याची सुरुवात करतात.

पंचांगकरतदिली माहिती
असा साजरा केला जातो गुडीपाडवा
गुडी पाडव्याला भारतीय नागरिक सकाळी उठून घराची स्वच्छता करतात. शरीरास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करतात. दरवाजासमोर रांगोळी काढतात. नवीन वस्त्रे परिधान करतात. देवाची पूजा करतात. घराच्या दरवाजाला पानांची तोरण बांधतात. बांबू(वेळू)एक काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकास तांबडे वस्त्र, फुलांची व साखर माळ घालून त्यावर तांब्या पालता ठेवतात. याला गुढी म्हणतात आणि या गुडीस ब्रम्हध्वज असे म्हणतात.
पंचांगाची पूजा केली जाते
गुढीपाडव्याला पंचपक्वानाचे भोजन करून पाडवा आनंदाने साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्र राज्यात पहावयास मिळते. समाजकार्य करून गरिबांना मदत केली जाते. गुढीपाडव्याला पंचांग आणले जाते आणि त्याचे देखील पूजन केले जाते. गुडी पाडव्यापासून पंचांगाचे वापर सुरू होते.
गुढीपाडवा सणाचा इतिहास
गुढी पाडव्याबाबत अनेक उत्पत्ती सांगण्यात आल्या आहेत. ब्रह्मदेवाने ही सृष्टी चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केली असे पुराणात सांगितले आहे. त्यामुळे दरवर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. शालिवाहन शकासंबंधी दोन कथा सांगितल्या आहेत. पहिल्या कथेप्रमाणे शालिवाहन राजाच्या एका राजाने मातीचे सैन्य तयार करून त्यांच्यात जीव भरला आणि त्यांच्या मदतीने शत्रूचा पाडाव केला. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शक सुरू झाला. दुसऱ्या कथेप्रमाणे पैठणच्या शालिवाहन राजाने शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचापासून जनतेची मुक्तता केली. आणि त्या विजया प्रित्यर्थ शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.