ETV Bharat / city

मावळ्यांना घडवलं ते शिवाजी महाराजांनीच; संभाजीराजेंच्या मुलाकडून संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपल्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं. खास करुन त्यांनी शिवसेनेला विनंती केली होती. परंतु शिवबंधन बांधा, आम्ही तुमची उमेदवारी जाहीर करतो, अशी भूमिका सेनेने घेतली. सेनेची भूमिका संभारीजेंना मान्य नसल्याने सध्या त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे वृत्त आहे. तत्पूर्वी संभाजीराजे व सेना यांच्या घमासानादरम्यान संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

मावळ्यांना घडवलं ते शिवाजी महाराजांनीच
मावळ्यांना घडवलं ते शिवाजी महाराजांनीच
author img

By

Published : May 30, 2022, 9:10 PM IST

सोलापूर - मला राजकारण फार काही कळत नाही पण काल माध्यमां मधून माहिती मिळाली होती की, मावळ्यांमुळे छत्रपती घडतात. पण मला सांगायचंय की छत्रपतीही मावळे घडवतात. मावळे कुणामुळे घडतात तर महाराजांमुळे, ही देवाण-घेवाणीची प्रक्रिया आहे, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मावळे असतात म्हणून राजे असतात, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी संभाजी आरमारच्या कार्यक्रमात सोलापुरात पलटवार केला आहे.

संजय राऊत यांना शहाजीराजेंचा प्रत्युत्तर - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपल्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं. खास करुन त्यांनी शिवसेनेला विनंती केली होती. परंतु शिवबंधन बांधा, आम्ही तुमची उमेदवारी जाहीर करतो, अशी भूमिका सेनेने घेतली. सेनेची भूमिका संभारीजेंना मान्य नसल्याने सध्या त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे वृत्त आहे. तत्पूर्वी संभाजीराजे व सेना यांच्या घमासानादरम्यान संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

सोलापुरात संभाजी आरमारचा 14 वर्धापन दिन - सोलापूर शहरातील सामाजिक संघटना संभाजी आरमारच्या १४ व्या वर्धापन दिनी सोलापुरात शिवपूर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती यांना निमंत्रित केले होते. मात्र राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी त्यांनी युवराज छत्रपती शहाजीराजे यांना सोलापूरात पाठवले होते. यावेळी केलेल्या मोजक्या भाषणात त्यांनी सूचक पण सध्याच्या राजकीय परिस्थितीला धरुन महत्त्वाचं विधान केलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.