सोलापूर - माजी खासदार किरीट सोमैया आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापूर शहर आणि सांगोला येथे भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले. सोलापूर शहरात असताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पवार कुटुंबायांवर मोठे आरोप केले आहेत. अजित पवारांच्या बहिणी जरंडेश्वर साखर कारखान्यात भागीदार आहेत. याबाबतचे पुरावे मी ईडीला पाठवणार आहे. आणि शरद पवार यांनी हे खोटं आहे असे सिद्ध करून दाखवावं, असे आव्हान किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत केले.
किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत पवार कुटुंबीयांना सवाल केला आहे की, अजित पवार व शरद पवार बोलतात की, माझ्या बहिणीचा काहीही संबंध नाही. संबंध नसताना ईडी चौकशी करत आहेत. मात्र अजित पवारांच्या बहिणी आणि त्यांचे मेहुणे जरंडेश्वर कारखान्यात पार्टनर आहेत. पवार कुटुंब कुणाशी बेईमानी करत आहे? ही बेईमानी बहिणीशी की महाराष्ट्र राज्यातील जनतेशी, असा सवाल किरीट सोमैयांनी उपस्थित केला.
शरद पवारांना किरीट सोमैया यांचे खुले आव्हान -
माजी खासदार किरीट सोमैया यांनी शरद पवार यांना खुले आव्हान दिले आहे. हे पुरावे मी ईडी आणि आयकर विभागाला देणार आहे. सहकार न्यायालयात ही सर्व पुरावे जमा करणार आहे. यातील एकही कागद खोटा असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असे ओपन चॅलेंज शरद पवार यांना दिले आहे.
हे ही वाचा - ...अब किसके नसीब से महंगाई बढ रही है! राष्ट्रवादीचा पंतप्रधानांना टोला
काही दिवसांपूर्वी अजित पवारांसह त्यांच्या बहिणींच्या घरी आयकर विभागाचं धाडसत्र सुरु होतं. याबाबत बोलताना शरद पवारांनी सरकारी यंत्रणांचा खरपूस समाचार घेतला होता. याबाबत बोलताना किरीट सोमैया म्हणाले की, "ठाकरे सरकारचं रिमोट कंट्रोल असणाऱ्या शरद पवारांनी अजित पवारांच्या घरावरील आयकर विभागाच्या धाडींसंदर्भात वक्तव्य केलं. पवार साहेबांना माझा प्रश्न आहे की, इंडोकोम प्रा. लि. कोणाचं आहे? त्यांनी अजित पवार यांना 100 कोटी किती वर्षांपूर्वी दिले होते?