सोलापूर - सोलापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ( Babasaheb Ambedkar Birth Anniversary ) मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. सोलापुरातील जयंती पाहण्यासाठी राज्यभरतील नागरिक सोलापूर दाखल होतात. पण यंदाच्या जयंतीत डीजे किंवा डॉल्बी वाजवले जाणार नाही, अशा सक्त सूचना सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी दिले होते. या आदेशविरोधात सोलापुरात ( Solapur Bhim Sainik Morcha For DJ ) बहुजन समाज एकवटला आहे. पोलीस प्रशासन विरोधात वेगवेगळ्या प्रकारे संताप व्यक्त केला जात आहे. आज शुक्रवारी दुपारी मध्यवर्ती महामंडळ जयंती उत्सव समितीच्या आनंद चंदनशिवें, बाळासाहेब वाघमारे, अमोल उर्फ रॉकी बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय जात असताना सय्यद शाहजहूर या मशिदीमधून अजानचे ( Bhimsainik Stop Slogan Near Mosque ) आवाज आले. त्यावेळी आंदोलक आपल्या सर्व घोषणा बंद करून शांतपणे मार्गस्थ झाले. एक प्रकारे दलित बांधवानी मुस्लीम धर्मियांप्रती व मशिदी वरील भोंग्याचा आदर व्यक्त केल्याचे चित्र दिसून आले.
अजान सुरू असताना घोषणा बंद - सध्या महाराष्ट्र राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवा, असा अलटीमेटम राज ठाकरे यांनी दिला आहे. तर सोलापुरात याच भोंग्याचा आदर होताना दिसून आला. भीम सैनिक जयंती उत्सवाच्या आपल्या मागण्या घेऊन घोषणा करत जात असताना, एका मशिदीवरून अजानचे आवाज येऊ लागले. हे आवाज ऐकून सर्व दलित बांधवांनी आणि आंदोलकानी आपली घोषणाबाजी बंद केली आणि शांतपणे पुढे मार्गस्थ झाले. ज्यावेळी अजानचे आवाज बंद झाले त्यावेळी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली.
हेही वाचा - Sanjay Raut Allegation : INS विक्रांत नंतर सोमय्यांची आता 'टॉयलेट एक लव्ह स्टोरी'