ETV Bharat / city

अन्नाचा घास श्वसन नलिकेत अडकल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू - solapur marathi news

जेवण करताना अन्नाचा घास श्वसन नलिकेत अडकल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना माढा तालुक्यातील वडाचीवाडी (उ.बु) येथे घडली आहे.

an-11-year-old-boy-died-after-food-grass-got-stuck-in-his-respiratory-tract
अन्नाचा घास श्वसन नलिकेत अडकल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
author img

By

Published : Mar 12, 2021, 3:19 AM IST

माढा (सोलापुर) - जेवण करताना अन्नाचा घास श्वसन नलिकेत अडकल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना माढा तालुक्यातील वडाचीवाडी (उ.बु) येथे घडली आहे. रोहन सिद्धेश्र्वर निळे (वय ११ रा.वडाचीवाडी (उ.बु) ता.माढा) असं मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

रोहन यास गुरुवार ११ मार्च रोजी सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान उपचारासाठी माढा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. वैद्यकिय अधिक्षक डाॅ.सदानंद व्हनकळस यांनी रोहनचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषीत केले.

माढा पोलिसांत नोंद-

रोहनच्या नातेवाईकांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, रोहन हा पायाने दिव्यांग होता. त्याने गुरुवारी दुपारी शाबुदाणा खाल्ला होता. त्यास अधिक त्रास वाटू लागल्याने त्याला माढ्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले तेथून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते.

माढा ग्रामीण रुग्णालयात रोहनचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने माढा पोलिसांत नोंद देण्यात आली आहे.

रोहनच्या श्वसनलिकेत अन्नाचा घास अडकल्याने त्याला गुदमरून आले. त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. रोहनला झटका येत होता, असे नातेवाईकांनी आम्हाला माहिती दिली आहे.

-डाॅ.सदानंद व्हनकळस,वैद्यकिय अधिक्षक माढा ग्रामीण रुग्णालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.