ETV Bharat / city

सोलापूरकरांना 'मॉर्निंग वॉक' पडलं महागात, वर्कआऊट केलं पोलीस ठाण्यात - corona update solapur

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू केलेली असताना सोलापूर शहरात मॉर्निंग वॉक करायला बाहेर पडलेल्या २२ जणांवर सोलापूर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

सोलापूरकरांना 'मॉर्निंग वॉक' पडलं महागात, वर्कआऊट केलं पोलीस ठाण्यात

author img

By

Published : Apr 17, 2021, 3:12 PM IST

सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू केलेली असताना सोलापूर शहरात मॉर्निंग वॉक करायला बाहेर पडलेल्या २२ जणांवर सोलापूर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच शहरातील इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॉर्निंग वॉक करणाऱ्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे.

राजेंद्र बहिरट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फौजदार चावडी पोलीस स्टेशन

मॉर्निग वॉकसाठी फिरणे म्हणजे विनाकारण बाहेर फिरणे आहे-

सध्या सोलापुरात सर्वत्र कडक संचारबंदी लागू केलेली आहे.त्यामुळे नागरिकांना अनावश्यक बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.असे असतानाही शहराच्या अवंती नगर, अभिमानश्री नगर आणि वसंत विहार परिसरातील पुरुष, महिला युवक-युवती आणि वृद्ध मॉर्निंग वॉकसाठी आज शनिवारी सकाळी बाहेर पडले होते.त्यामुळं रस्त्यावर गर्दीचे चित्र निर्माण झाले.सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे,हा कोविड नियमावली तोडणे किंवा आपत्ती व्यवस्थापनचे उल्लंघन करणे आहे.त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणार्यावर गुन्हे दाखल होत आहेत.

दंडाची रक्कम भरल्यावरच सोडण्यात आले-

फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना गर्दी झाल्याची माहिती कळाली तेंव्हा पोलिसांनी तातडीने मॉर्निंग वॉक रुटवर जाऊन कारवाई केली. या कारवाईत १७ पुरुष आणि ५ महिला आणि युवतींना ताब्यात घेण्यात आले. या सर्वांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणून बसविण्यात आले. त्यानंतर प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. यावेळी ट्रॅकसुटवर आणि बरमोडावर बाहेर पडलेल्या वॉकर्सची दंडाची रक्कम भरताना एकच पंचाईत झाली. मग त्यांनी पोलीस ठाण्याच्या जवळपास राहणाऱ्या नातेवाईक आणि मित्रांना फोन करुन पैसे मागविले. शेवटी दंडाची रक्कम भरल्यावरच सर्वांना सोडून देण्यात आले.

हेही वाचा - महाराष्ट्रात समुद्रामार्गे येणार ऑक्सिजन; राज्य सरकारच्या हालचाली सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.