ETV Bharat / city

Food Poisoning : सोलापुरातील सिद्धेश्वर महिला महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा - Chavadi Police Station in Solapur

सोलापूर शहरातील सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निकमध्ये वसतिगृहात ( Siddheshwar Mahila College in Solapur ) राहत असलेल्या तब्बल 27 मुलींना अन्नातून विषबाधा ( Food poisoning ) झाली आहे.

Food poisoning
विषबाधा
author img

By

Published : Jul 27, 2022, 8:39 PM IST

सोलापूर - सोलापूर शहरातील सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निकमध्ये वसतिगृहात ( Siddheshwar Mahila College in Solapur ) राहत असलेल्या तब्बल 27 मुलींना अन्नातून विषबाधा ( Food poisoning ) झाल्याची घटना घडली आहे. या मुलींना सिद्धेश्वर मल्टी स्पेशल या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सिद्धेश्वर महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी मोठ्या संख्येने अश्वस्थ होऊन उपचारासाठी दाखल झाल्याने फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे ( Chavadi Police Station in Solapur ) वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी रुग्णालयात चौकशीसाठी आले आहेत. वसतिगृहात मेस चालकाने कोणत्या प्रकारचे जेवण दिले. याबाबत सविस्तर माहिती घेण्याचे कार्य पोलीस अधिकारी करत आहेत.

अन्नातून विषबाधा

हेही वाचा - The Bullion Exchange : इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजचा मुंबई शेयर मार्केटवर परिमाण होणार नाही; तज्ञांचे मत

मंगळवारी रात्री अन्नातून विषबाधा - सोलापूर तुळजापूर मार्गावर असलेल्या रुपाभवानी चौकाजवळ सिद्धेश्वर वूमन्स पॉलिटेक्निक ( Siddheshwar Women Polytechnic College ) आहे. या महिला महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी कॉलेज परिसरात असलेल्या वसतिगृहात राहतात. मंगळवारी रात्री विद्यार्थीनी जेवण करून झोपल्या होत्या. दरम्यान मध्यरात्री या विद्यार्थीनीना मळमळू लागले. त्यामुळे अनेक विद्यार्थिनींना उलटी जुलाब झाले त्या तशाच झोपी गेल्या. बुधवारी सकाळी दिवसभरात उपचारासाठी दाखल-बुधवारी सकाळी नाष्टा केल्यानंतर या विद्यार्थीनीना उलट्या जुलाब ( Vomiting diarrhea ) होऊ लागले. हॉस्टेलमधील व्यवस्थापकाने एक-एक करून बुधवारी दिवसभरात 27 विद्यार्थीनीना उपचारासाठी दाखल केले. वसतिगृहाच्या प्रशासनाने या विद्यार्थिनींना बुधवारी दिवसभरात एसटी स्टँड परिसरातील सिद्धेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दोषींवर कठोर कारवाई - पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय पाटील इतर अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन पाहणी केली आहे. सर्व विद्यार्थीनिंची विचारपूस केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - Women Fight For Water : आदित्य ठाकरेंनी तयार केलेला पुल गेला वाहून; हंडाभर पाण्यासाठी महिलांची जीवाची बाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.