पिंपरी चिंचवड ( पुणे ) - पिंपरी-चिंचवडमधील काटे पुरम चौक येथे भरदिवसाअज्ञात दोघांनी गोळीबार करून एकाचा खून ( PCMC murder case ) केला आहे. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. योगेश जगताप असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोळीबार करताना आरोपी हे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दहाच्या सुमारास योगेश जगताप हे काटे पुरम चौकात थांबले होते. अचानक त्यांच्यावर दोघांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्या. ते पाहून जगताप पळत सुटले. मात्र, गोळीबारात त्यांना दोन गोळ्या लागल्या ( Youth shot dead by two persons in PCMC ) होत्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.
गोळीबारात जखमी झालेल्या योगेश जगताप यांचा ( Yogesh Jagtap Murder in Pimpari Chichwad ) उपचादरम्यान मृत्यू ( Pimpri Chinchwad Murder incident ) झाला आहे. सीसीटीव्हीवरून आरोपींचा शोध सुरू आहे.
गजबजलेल्या ठिकाणी खून झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह
काटे पुरम चौक हा नेहमी गजबजलेला असतो. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी रस्त्यावरील दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून त्याची दुचाकी पळवून नेली आहे. घटनास्थळी माहिती मिळताच सांगवी पोलीस दाखल झाले आहेत. अद्याप गोळीबाराचे कारण समजू शकलेले नाही.
हेही वाचा-Aurangabad Crime - भोळसर मुलाला भिकेला लावून सावत्र बापाने जिवंतपणी घातला दिवस
खुनाचा प्रयत्न करून वाहनांची तोडफोड, १२ तासांत आरोपी गजाआड
पुण्यातील बिबवेवाडीत असलेल्या शेळकेवस्तीत घुसून तलवार आणि कोयत्याची भीती दाखवत नागरिकांमध्ये दहशत ( Terror Of Gang In Pune ) पसरविणाऱ्या ७ जणांच्या टोळीला बिबवेवाडी पोलिसांनी जेरबंद केले ( Bibavewadi Police Arrested Accuse ) आहे. आरोपींचे कोंढवा खुर्द येथील काकडेवस्तीत राहत असलेल्या अमीर खान (Pune Amir Khan ) व त्याच्या साथीदारांशी वाद होते. त्यावरून आरोपींनी शेळकेवस्ती येथे जात दहशत माजवली.