पुणे - शहरातील वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धुम्रपान (स्मोकिंग) करण्यासाठी रुम पार्टनरकडून होत असलेल्या जबरदस्तीमुळे 18 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्वेनगर येथील एका बॉईज हॉस्टेलमध्ये 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान ही घटना घडली. सागर अशोक पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी या प्रकरणी लक्ष्मण वासुदेव पाटील (वय 30) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर पवार हा मागील तीन-चार दिवसांपूर्वी कर्वेनगर परिसरातील पठान हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी आला होता. तो खासगी कंपनीत नोकरी करीत होता. त्याच्या खोलीमधील लक्ष्मण पाटील हा धुम्रपानाचे व्यसन करीत होता. सागरनेही व्यसन करावे, यासाठी तो त्याच्यावर जबरदस्ती करीत होता. सागरने त्याला नकार देताच ठार मारण्याची धमकी देत होता. यामुळे कंटाळून सागरने रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
वारजे पोलिसांनी या प्रकरणी आरोपी लक्ष्मण पाटील याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. जाधव करीत आहेत.
धुम्रपान करण्याकरता रुम पार्टनरकडून जबरदस्ती; 18 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - तरुण आत्महत्या न्यूज
लक्ष्मण पाटील हा धुम्रपानाचे व्यसन करीत होता. सागरनेही व्यसन करावे, यासाठी तो त्याच्यावर जबरदस्ती करीत होता. सागरने त्याला नकार देताच ठार मारण्याची धमकी देत होता. यामुळे कंटाळून सागरने रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.