पुणे - शिवाजीनगरजवळील मुळा नदीपात्रामध्ये पोहायला गेलेल्या चार ते पाच युवकांचा पैकी एक युवक नदीमध्ये वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहेत. दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलिसांनी युवकाचा शोध सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळ काही युवक पोहण्यासाठी नदीपात्रामध्ये गेले होते. यापैकी एक युवक पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला आहे. यासंदर्भात नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या वतीने शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.