पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव खूपच चर्चीला जात आहे. शिवसेनेतून बंड केल्यानंतर गुवाहटी ते मुख्यमंत्री या कालावधीत एकनाथ शिंदे हे नाव सध्या घराघरात पोहोचलेला आहे. अशातच पुण्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या सारखे दिसणार एक तरुण सध्या खूपच चर्चेत आला आहे. विजयराजे माने ( Vijayaraj Mane ) असे या तरुणाचा नाव आहे. हा तरुण जिथे जात आहे, तिथे त्याच्यासोबत नागरिक फोटो काढण्यासाठी जमा होत असून सध्या पुण्याच्या या एकनाथ शिंदेंचा क्रेझ वाढताना दिसून येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. मात्र आज एक दिवस आधीच पुण्यात एकनाथ शिंदे यांचे डुप्लिकेट अवतरले आहेत. विजयराजे माने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखेच दिसतात. माने यांनी चेहऱ्यावर वाढवलेली दाढी, कपाळावरचा टिळा, आणि त्यांनी परिधान केलेले वाईट शर्ट आणि वाईट पॅन्ट, आणि ते वापरत असलेला एकनाथ शिंदे यांच्यासारखाच चष्मा. या सगळ्यांमुळे माने हे शिंदे यांच्या सारखे डुप्लिकेट दिसतात. एवढेच नाही तर अनेक सामान्य पुणेकर माने यांना भेटत आपल्या मागण्यांचा अर्ज देखील देताना दिसतात.
मी जिथे जातो तिथे लोक माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी आग्रह करतात. लोक मला थांबवून सेल्फी घेण्याचा आग्रह करतात. मी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस असून यावेळी महापालिका निवडणूक लढवणार आहे. तसेच उद्या ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात येतील त्यावेळी मी त्यांची भेट घेणार असल्याचे देखील माने यांनी यावेळी सांगितल आहे.
हेही वाचा - Aaditya Thackeray : 'संजय राऊतांवर झालेली कारवाई राज्यपालांचे वक्तव्य...'; आदित्य ठाकरेंची टीका