ETV Bharat / city

Year Ender 2021 Pune : जाणून घ्या, सरत्या वर्षातील पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडी

author img

By

Published : Dec 31, 2021, 7:06 PM IST

सरत्या वर्षाला निरोप देताना पुण्याती महत्त्वाच्या घटनांवर नजर टाकू. यामध्ये पुण्यातून कोव्हिशिल्डच्या उत्पादनाला सुरुवात (Covishield production in Pune ),ड्रग्ज प्रकरणात पंच किरण गोसावीला अटक ( Kiran Gosawi arrest in Pune ), बाबासाहेब पुरदंरे यांचे निधन ( Babasaheb Purandare death in Pune ) या घटनांचा समावेश आहे. वर्षाखेर पेपर फुटीचे बिंग उघडकीस ( TET exam scam Pune ) आले.

Year Ender 2021 Pune

पुणे - मुंबईपेक्षा मोठ क्षेत्रफळ असणााऱ्या पुण्यातील काही घटनांनी देशाचे लक्ष वेधले. यामध्ये सीरमचे उत्पादन आणि ड्रग्ज प्रकरणातील किरण गोसावीची अटक अशा घटनांचा समावेश आहे. 2021या वर्षी पुण्यात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत. या घटनांचा ईटीव्ही भारतने आढावा घेतला.

  1. पुण्यातून कोव्हिशिल्डच्या उत्पादनाला सुरुवात (Covishield production in Pune ) - वर्षाच्या सुुवातीला म्हणजेच 16 जानेवारीला पंतप्रधान मोदींनी संपूर्ण भारतात कोविड लसीकरणाला सुरुवात केली होती, या लसीकरणा साठी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन स्वदेशी लस तयार करण्यात आल्या होत्या. त्यातली कोविशिल्ड ही पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये तयार करण्यात आली होती. देशभरात कोरोना लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरूवात झाली होती. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सना लसीकरण कार्यक्रमात प्राधान्य देण्यात आले होते. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोव्हिड-19 विरोधी लशीला आपात्कालीन वापराची परवानगी देण्यात आली होती. भारत बायोटेकची 'कोव्हॅक्सिन' ही भारतात तयार झालेली पहिली कोरोनाविरोधी स्वदेशी लस होती. 'कोव्हॅक्सीन' ला भारतात आपात्कालीन परवानगी मिळाल्यानंतर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होत. काँग्रेससोबतच देशातील एका मोठ्या गटाने ही लस प्रभावी आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
    सिरमचे उत्पादन सुरू
    सिरमचे उत्पादन सुरू
  2. सिरम इन्स्टिट्यूटला आग- 21 जानेवारीला कोविशिल्ड तयार करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला आग लागली होती. मात्र त्याचा कोविड लस तयार करणाऱ्या ठिकाणी कोणताही परिणाम झाला नाही. जगाला कोरोना लशीचा (Covid Vacccine) सर्वात मोठा पुरवठा करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या ( Serum institute fire ) औषध कारखान्याला आग लागली होती आणि त्यामुळे. लसनिर्मितीवर परिणाम होणार का असा प्रश्न सर्वांना भेडसावत होता. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने संशोधित केलेली लस कोविशील्ड (Covishield)नावाने सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत होती. कोविशील्ड लशीचा स्टॉक सुरक्षित आहे. आगीचा कोणता धोका पोहोचलेला नाही अशी माहिती त्यावेळी समोर आली होती.
    सिरमला लागली आग
    सिरमला लागली आग
  3. तरुणीच्या आत्महत्येनंतर मंत्री संजय राठोड अडचणीत ( Puja Chavan suicide in Pune ) - 14 फेब्रुवारीला पुजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली. या आत्महत्येच्या प्रकरणातील संशयित अरुण रोठड यांचे चौकशीचे आदेश मुख्यमत्र्यांनी दिले होते. तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचे समोर आले होते.
  4. पुणे शहरात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार आणि तुटवडा ( Remdesivir shortage in Pune ) - पुणे महापालिकेच्या कोव्हिड केअर सेंटर आणि जम्बो रुग्णालयात रेमडेसिव्हिरचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांवर इंजेक्शन मिळवण्यासाठी शहरभर वणवण फिरण्याची वेळ आली होती. पुणे महापालिकेने रुग्णसंख्या वाढल्यानंतर कोव्हिड केअर सेंटर आणि जम्बो रुग्णालय सुरू केले होते. पण येथे दाखल असणाऱ्या रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात 'रेमडेसिव्हिर'चा साठा करून ठेवलेला नव्हता. त्यामुळे शहरात इंजेक्शन मिळत नसल्याचे चित्र होते. दुसरी कडे रेमडीसिव्हारचा काळा बाजार चालला होता. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली पुणे मेट्रो अखेर 31 जुलै ला सकाळी प्रत्यक्षात धावताना पाहायला मिळाली होती. गेल्या काही महिन्यांपासून पुणे मेट्रोच्या वेगवेगळ्या टप्प्यांची कामे समांतर पद्धतीने करण्यात येत होती. आधी वनाज ते रामवाडी या भागाची चाचणी ७ जुलै रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्याची चाचणी करण्यात आली होती. या टप्प्यातील मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.
  5. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराने हादरले पुणे शहर- पुण्यातील वानवडी (Wanwadi Police, Pune) परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या (Minor girl gang raped) घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. पीडित मुलीवर ठाण्यातही बलात्कार (victim girl raped in Thane) झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी ठाण्यातून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींची संख्या 17 झाली होती. पुण्यातील या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे धागेदोरे ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. या संपूर्ण प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
    अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरण
    अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरण
  6. मंत्र्यांशी संबंधित कारखान्यांवर प्राप्तिकर विभागाच्या धाडी ( IT raid on Jarandeshwar factory ) - 8 ऑक्टोबरला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स (Income tax) विभागाची कारवाई करण्यात आली होती. दौंड शुगर ,आंबलिक शुगर , जरंडेश्वर साखर, पुष्पदंतेश्वर शुगर व नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर ही कारवाई करण्यात आली होती. आयकर विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली होती.
    हे सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती त्यावेळी समोर आली होती जरंडेश्वर कारखान्यात एक टीम तर अंबालिका साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक वाघ यांच्या काटावाडीतील घरी तपास यंत्रणा पोहोचल्या होत्या.
    साखर कारखाना आयटी धाड
    साखर कारखाना आयटी धाड
  7. ड्रग्ज प्रकरणात पंच किरण गोसावीला अटक ( Kiran Gosawi arrest in Pune ) - 28 ऑक्टोबरला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. आर्यन खानसोबतच्या सेल्फीमुळे वादात आलेल्या किरण गोसावीवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप किरण गोसावीवर होता.
  8. बाबासाहेब पुरदंरे यांचे निधन ( Babasaheb Purandare death in Pune ) - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे 15 नोव्हेंबरला पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते १०० वर्षांचे होते. बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती.
    बाबासाहेब पुरंदरे
    बाबासाहेब पुरंदरे
  9. पेपर फुटीचे बिंग उघडकीस ( TET exam scam Pune ) - 8 डिसेंबरला आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणाचा छडा लावण्यात पुणे सायबर पोलिसांना (Pune cyber police) यश आले. लातूर येथील आरोग्य संचालनायतील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांनीच हा पेपर फोडल्याचे पोलीस तपासात समोर उघड झाले. प्रशांत बडगिरे याने त्याच्याच विभागातील डॉ. संदीप जोगदंड यांच्याकडून 10 लाख आणि शाम म्हस्के यांच्याकडून 5 लाख रुपये घेऊन हा पेपर फोडला होता. पुणे पोलिसांची सायबर शाखा या प्रकरणाचा तपास करत होती. त्यात प्रशांत बडगिरेसह 11 आरोपींना अटक करण्यात आली.
    पेपर फुटी प्रकरण
    पेपर फुटी प्रकरण
  10. पेपरफुटीचा फसला डाव (Mhada Exam scam ) - 14 डिसेंबरला म्हाडा पेपर फुटी प्रकरण समोर आले होते. जीए सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतीश देशमुख याने म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी जवळपास १० एजंटांशी संपर्क केला होता. त्यांच्यामार्फत तो पेपर फोडण्याचा त्याचा कट असल्याचे तपासात उघडकीस आले होते. तसेच त्या उत्तर पत्रिका कोऱ्या ठेवण्याचे ठरले होते. पुढे या सर्व उत्तरपत्रिका देशमुख काम करीत असलेल्या कंपनीच्या ताब्यात येणार होत्या. उत्तरपत्रिका तपासण्याच्या वेळी एजंटमार्फत आलेल्या परिक्षार्थीच्या ओएमआरशीटमध्ये देशमुख गुण भरून फेरफार करणार होता. मात्र, ऐनवेळी पुणे पोलिसांनी पेपरफुटीचा माहिती मिळाली आणि देशमुखचा डाव फसला.
    म्हाडा पेपर फुटी प्रकरण
    म्हाडा पेपर फुटी प्रकरण
  11. सुखदेव डेरे यांना अटक ( Sukhdev arrest in Pune ) -18 डिसेंबरला राज्यात टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटकेचे सत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत होते. टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक केली. सुखदेव डेरे हे 2017 साली जेव्हा जीए टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेकडून परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळाले होते, तेव्हा शिक्षण परिषदेचे आयुक्त होते. या सगळ्यांनी मिळून 2018 साली झालेल्या टीईटी परीक्षेतही अशाचप्रकारे अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याचे समोर आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.