ETV Bharat / city

Har Ghar Tiranga : पुण्यातील शेख कुटुंब 4 पिढ्यांपासून बनवतंय 'तिरंगा'; पाहा स्पेशल रिपोर्ट - Making Tricolor

हर घर तिरंगा मोहीमे ( Tricolor campaign ) अंतर्गत बाजारपेठेत तिरंगा दाखल ( Tricolor entered the market ) झाले असून नागरिक हे बाजारात तिरंगा खरेदी करताना दिसत आहे. अशातच 15 ऑगस्ट ( 15 August Independence Day ) ही काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शाळे बाहेर तसेच शहरातील चौका चौकात लहान मुलांसाठी झेंडे बनविण्याचे सुरू आहे.

Flag making has started
ध्वजनिर्मिती सुरू
author img

By

Published : Aug 4, 2022, 8:42 PM IST

पुणे - सध्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष ( Jubilee Year of Independence ) विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. हर घर तिरंगा मोहीमे ( Tricolor campaign ) अंतर्गत बाजारपेठेत तिरंगा दाखल ( Tricolor entered the market ) झाले असून नागरिक हे बाजारात तिरंगा खरेदी करताना दिसत आहे. अशातच 15 ऑगस्ट ही काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शाळे बाहेर तसेच शहरातील चौका चौकात हे लहान मुलांसाठी जे झेंडे बनविले जातात. ते झेंडे विक्री केले जातात.त्या झेंडे बनवायला सुरवात झाली आहे. पुण्यातील राजेंद्र नगर मध्ये राहत असलेल्या शेख कुटुंबाकडून चार पिढ्यांपासून हे तिरंगा बनविले जात आहे. शेख कुटुंबीय अभिमानाने हे काम करत आहे. विशेष म्हणजे शेख कुटुंबियांकडून बनविण्यात आलेले हे झेंडे शहरभर पुरवले जातात.

ध्वजनिर्मिती सुरू

चार पिढ्यांपासून शेख कुटुंबीय बनवत आहे झेंडे - मोहम्मद शरीफ शेख यांनी 50 वर्षापूर्वी झेंडे बनविण्याचा काम सुरू केलं. हा झेंडा बनविण्याचे कार्य आज त्यांच्या चौथ्या पिढीपर्यंत येऊन पोहचला आहे. आज इलियास शेख, त्यांचा मुलगा कुद्दूस शेख, कुद्दूस शेख यांची मुलगी सदिया शेख हा व्यवसाय अभिमानाने करत आहे.आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळात ही शेख कुटुंबीय 15 ऑगस्ट, ( 15 August Independence Day ) 26 जानेवारीच्या ( Republic Day ) सहा महिन्यांपूर्वी पासून तयारी करतात.

making flags has started
झेंडे बनविण्याचा काम सुरू

व्यवसाय म्हणून नव्हे तर देशसेवा म्हणून करतो काम - शेख कुटुंबाचा हा पारंपरिक व्यवसाय, राजेंद्र नगरमधील दत्त मंदिराजवळ शेख कुटुंब गेल्या काही वर्षापासून राहत आहे.या कुटुंबातील पुरुष हे लग्न किंवा पाट्यांमध्ये डेकोरेशनचं काम करतात. पण ऑगस्ट, जानेवारीत मात्र, ही मंडळी घरच्यांबरोबर झेंडे तयार करण्याच्या कामात गढून जातात. शहरातील सर्व किरकोळ विक्रेते यांच्याकडूनच झेंडे नेतात. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनी शहरभर चक्क लाखभर झेंडे शेख कुटुंबियांकडून पुरवले जातात. "हमारे ससूरजी से इस काम का सिलसिला शुरू हुआ, उसके बाद हमारे घर में अबतक ये काम चालू हैं. सब औरते और बच्चे मिलके झंडे बनाते है," असं अभिमानाने यावेळी इलियास शेख सांगतात. हे काम करायला आम्हाला अभिमान वाटतो. काम आम्ही व्यवसाय म्हणून नव्हे तर देशसेवा म्हणून करत असतो अस देखील यावेळी शेख म्हणाल्या.

making flags has started
झेंडे बनविण्याचा काम सुरू

यंदा 40 हजारहुन अधिक बनविण्यात आले झेंडे - 15 ऑगस्ट, 26 जानेवारीच्याआधी 5 ते 6 महिन्यांपूर्वी आम्ही झेंडे करण्याचं काम सुरू करतो. दिवसाला पाच हजार झेंडे सहज बनवतो. सारे पुना शहरमे जिधर देखो हमारे ह्यांसेही झंडा जाते है. असं सांगत गेली 2 वर्ष कोरोनामुळे फक्त 8 हजारच्या आसपासच झेंडे बनविले. पण सर्व सुरू झाल्याने झेंड्यांना चांगली मागणी असल्याने यंदा आम्ही 40 हजारहुन अधिक झेंडे केल्याच यावेळी कुद्दुस शेख यांनी सांगितल.

making flags has started
झेंडे बनविण्याचा काम सुरू

असं बनवितात झेंडे -15 ऑगस्ट, 26 जानेवारी या सणांच्या 6 महिन्याआधी शेख कुटुंबीय झेंडे बनविण्याची तयारी सुरू करतात. मंडईतून बांबूच्या काड्या, तिरंगी ताग, जिलेटीन पेपर, भिरभिन्यासाठी तारा अशा वस्तू आणतात. "बांबूच्या काड्यांना डिंक लावणे, तिरंगा पेपर चिकटवणे, मग तारांच्या तुकड्यांनी जिलेटीन कागदाचं चक्र लावणे असं हे काम सलग सुरू असतं. मिरभिन्यांचे झेंडे कुणालाही परवडतील अशा दरात बाजारात येतात. त्यामुळे या झेंड्यांच्या उत्पादन खर्चाची काळजी घेणं गरजेचं असतं. कच्च्या मालाची नासधूस होऊन चालत नाही. विशेषत: डिंक, कागदाचे ताग, जिलेटीन पेपर्स जपावे लागतात. हे काम किचकट असलं तरी आता आम्हाला सवय झाली असल्याने आम्ही पटापट झेंडे बनवतो असं देखील यावेळी इलियास शेख म्हणाल्या.

making flags has started
झेंडे बनविण्याचा काम सुरू

हेही वाचा - Rahul Gandhi : राहुल गांधींचं मोदींना थेट चॅलेंज.. म्हणाले, 'काय करायचं ते करा, मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही..'

घरातील सर्वच व्यक्ती बनवितात झेंडे - शेख कुटुंब मोठं आहे. घरातले दहा लोक या कामात गुंतलेले असतात. एक व्यक्ती दिवसाला अंदाजे पाचशे ध्वज बनवते. दर दिवशी किमान पाच हजार झेंडे तयार होतात. कामाचा व्याप केवढा आहे हे त्यातून कळावं. अर्थात, हे कुटुंब लाखभर झेंड्यांचे उत्पादन करत असलं, तरी त्यातून फार नफा मिळत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण शेख कुटुंबीयांना एक झेंडा बनविण्यासाठी किमान 2 ते अडीच रुपये खर्च येतो. तो झेंडा ते 3 ते 4 रुपयांमध्ये विकतात. विकताना एक झेंडा नव्हे तर, ते शेकड्यांच्या हिशोबाने किरकोळ व्यापाऱ्यांना विकतात. मग हाच झेंडा बाजारात 10 ते 15 रुपयांना विकला जातो.

making flags has started
झेंडे बनविण्याचा काम सुरू

लॉकडाऊनचा बसला होता फटका - लॉकडाऊनचा फटका इतर सर्वांप्रमाणेच या धंद्यालाही बसला आहे. कोरोना काळातील १५ ऑगस्टवर लॉकडाउनचं सावट होतं. शाळा बंद होत्या. लोक घराबाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे झेंड्यांची मागणीही घटली. पण 26 जानेवारीच्या वेळी निर्बंध हे थोड्या प्रमाणात शिथिल झाले होते तेव्हा 20 हजार झेंडे बनवण्यात आले होते. यंदा मात्र चांगल्या प्रमाणात झेंड्यांना मागणी असल्याचं शेख कुटुंबियांकडून सांगण्यात आला आहे.

making flags has started
झेंडे बनविण्याचा काम सुरू

हेही वाचा - BMC: दर्जेदार रस्त्यांसाठी पालिकेने केल्या "या" उपाययोजना; मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या सुचना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.