पुणे - शहरातील उंड्री परिसरात एका अपार्टमेंटमध्ये बंद खोलीत महिलेचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला आहे. बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. पूजा शेठ (34) असे मृत महिलेचे नाव आहे.
परदेशात असलेल्या एका खासगी कंपनीसाठी ही महिला घरातून काम करत होती. मूळ अहमदाबाद येथील असलेली ही महिला मागील तीन वर्षांपासून पुण्यात एकटीच राहत असल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा... नागपूर विभागात गेल्या 5 वर्षात 1,592 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 617 आत्महत्या मदतीसाठी अपात्र
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे एमबीएपर्यंत शिक्षण झाले असून ती अविवाहित होती. 26 जानेवारीपासून तिचे वडील तिला फोन करत होते. परंतु ती फोन उचलत नव्हती. बुधवारीही त्यांनी फोन केला असता तिने उचलला नाही. त्यानंतर त्यांनी घरमालकाला फोन करून विचारणा केली. घरमालकाने घरी येऊन त्याच्या जवळील चावीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता आतून कडी लावल्याने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांना याची माहिती दिली.
हेही वाचा... शरजील इमामला ५ दिवसांची पोलीस कोठडी
कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना ही महिला बेडरूममध्ये फरशीवर नग्नावस्थेत आणि मृत असलेली आढळली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.