बारामती : मागील भांडणाच्या कारणावरून महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून ( Woman murder by cutting throat) केल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर तालुक्यातील (Woman killing Indapur) मौजे लाकडी येथे घडला. रुपाली शेखर काटे ( रा. लाकडी, ता. इंदापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ललेंद्र मारुती शिंदे (वय 35 वर्षे, रा. साठेनगर, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेंद्र रामचंद्र जराड (रा. उदमईवाडी, ता. इंदापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Woman Murder in Baramati)
धारदार शस्त्राने कापला गळा- पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी ललेंद्र शिंदे यांची सावत्र बहिण रूपाली काटे सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रात:विधीसाठी गेली होती. त्या ठिकाणी आरोपी राजेंद्र जराड याने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला चढवत गळा चिरून पळून गेला. अशी माहिती फिर्यादीचे नातेवाईक कल्पना खरात यांनी फोनवरून दिली. फिर्यादी घटनास्थळी गेले असता रूपाली या मयत अवस्थेत दिसून आल्या. त्यांचा गळा चिरलेला दिसून आला. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलवून मयत रूपाली यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जात पुढील कारवाई सुरू केली. या घटनेचा उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत.