ETV Bharat / city

ट्रकची दुचाकीला धडक; पत्नीचा जागीच मृत्यू तर ३ जण जखमी - लक्ष्मी प्रमोद मालुसरे अपघात न्यूज

हडपसर परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या एका दाम्पत्याला ट्रकने धडक दिली. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती आणि दोन मुले जखमी झाली आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

woman Dead and 3 injured As Truck Hits Bike in fursungi pune
ट्रकने दुचाकीवरिल दाम्पत्याला चिरडले; पत्नीचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी
author img

By

Published : Dec 31, 2020, 10:18 AM IST

Updated : Dec 31, 2020, 10:23 AM IST

पुणे - हडपसर परिसरात आज सकाळच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकीवरून जाणाऱ्या एका दाम्पत्याला ट्रकने धडक दिली. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती आणि दोन मुले जखमी झाली आहेत. हडपसर परिसरातील फुरसुंगीमध्ये हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

लक्ष्मी प्रमोद मालुसरे (वय 32) असे मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रमोद मालुसरे (वय 38) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांची दोन मुलं किरकोळ जखमी झाली आहेत. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालुसरे पती-पत्नी मुलांसह फुरसुंगी येथून दुचाकीने भोर या गावी निघाले होते. त्यांची दुचाकी मंतरवाडी पुलावरून जात असताना पाठीमागून आलेल्या एका ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. त्यानंतर दुचाकीवरून खाली पडलेल्या लक्ष्मी मालुसरे ट्रकच्या चाकाखाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हडपसर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या प्रमोद मालुसरे आणि त्यांच्या दोन मुलांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

हेही वाचा - चोरांचा प्रतिकार न करणाऱ्या 'त्या' दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Last Updated : Dec 31, 2020, 10:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.