ETV Bharat / city

पिंपरी-चिंचवडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, डोक्यात घातला कोयता - पिंपरी चिंचवडी पत्नीची हत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून झाल्याची घटना घडली आहे. लग्नानंतर पत्नीपत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते. त्यात पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्या संशयातूनच झालेल्या वादात पतीने पत्नीचा खून केला.

संशयावरून पत्नीचा खून, डोक्यात घातला कोयता

author img

By

Published : Aug 18, 2021, 1:22 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे)- पिंपरी-चिंचवडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली असून आरोपी पतीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गौरी राहुल प्रतापे असे खून झालेल्या महिलेचे नाव असून राहुल गोकुळ प्रतापे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे परिसरात राहुल आणि गौरी हे दोघे राहात होते. त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे अस पोलीस तपासात समोर आले आहे. साडेतीन वर्षांपूर्वी त्या दोघांचा विवाह झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याने पत्नी गौरी माहेरी निघून गेली होती. यावरूनच राहुल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दरम्यान, पत्नीला समजावून सांगून तिला परत पुनावळे येथे आणले होते. मात्र, मंगळवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास भर रस्त्यात दोघांमध्ये भांडण झाले.

आधीच राहुलचा गौरीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याच दरम्यान, दोघांमध्ये भर रस्त्यात भांडण झाल्याने त्याच्या रागात आणखी भर पडली. या रागातूनच त्याने घरातून आणलेला कोयता थेट पत्नीच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात गौरीचा जागीच मृत्यू झाला, असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या, आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.