पुणे - काँग्रेस भवनाची भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी मंगळवारी तोडफोड केली. या घटनेनंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट आली आहे. पुणे शहराचे काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत, दोषींना अद्दल घडवल्याशिवाय थांबणार नसल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा... '...तर महाविकास आघाडीची माती झाल्याशिवाय राहणार नाही'
काँग्रेस भवनावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. ही काँग्रेसची संस्कृती नाही, असे रमेश बागवे यांनी म्हटले आहे. हे कृत्य करणारे कोणीही असो, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. मंत्रीपदाबाबत पुणे काँग्रेसचा काहीही संबंध नसताना हा प्रकार घडला. तो अतिशय निंदाजनक आसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यातस समाविष्ट असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई केली पाहिजे. आम्ही आता वरिष्ठ नेत्याने फोन केला, तरीही ऐकणार नाही. मात्र, अशा गुंडगिरी करणाऱ्यांना सोडणार नाही, असे बागवे यावेळी म्हणाले.
हेही वाचा... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत अपशब्द, महिला शिवसैनिकांनी अधिकाऱ्यावर ओतली शाई
भोर वेल्हा मुळशीचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांच्या समर्थकांनी पुण्यात जोरदार राडा केला. त्यांनी शिवाजीनगर येथील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. पुणे शहर व जिल्हा कार्यालय शिवाजीनगर येथे एकाच इमारतीत आहेत. तेथे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तोडफोड केली. यावेळी बागवे यांच्या कक्षाची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.