पुणे - पुण्यातील एफसी कॉलेज रोडवर हॉटेल सुरू झाले आहे. तस पाहिले तर असे हॉटेल सर्वत्रच सुरू होतात. त्यामध्ये नाविन्य काही नाही. मात्र, हे जे हॉटेल सुरू झाले आहे ते सामान्य हॉटेल्सपेक्षा काही वेगळे आहे. (Deaf Children Run Hotels Terrasinne) व्यंगामुळे आत्मविश्वास गमावून बसलेली अशी मुले कुचेष्टेच्या भीतीने सामान्यजनांपासून चार हात दूर राहाणे पसंत करतात. मात्र, त्या मुलांना येथे सन्मान देण्याचे काम केले आहे. या हॉटेलमध्ये काम करतात ते फक्त मूकबधीर मुलचं काम करतात.
हॉटेलमध्ये येणारांची गर्दी जास्त आहे
यातील सर्व मुलं बोलू आणि ऐकू शकत नाहीत. मात्र, शारिरीकदृष्ट्या व्यवस्थित असणाऱ्या मुलांसारखे काम करत आहेत. इतर हॉटेलपेक्षा या हॉटेलमध्ये येणारांची गर्दी जास्त आहे. (Deaf Children Run Hotels In Pune) येथे येणारे लोक कुतुहलाने येत आहेत. या मुलांशी संवाद करताना सर्वजन आपुलकीने संवाद साधत आहेत. त्यांना ऑर्डर देतानाही ग्राहक त्यांना समजेल अशा भाषेत बोलत आहेत.
तुम्हाला जे हवय त्याची ऑर्डर तुम्ही देवू शकता
काम करणाऱ्या मुलांना बोलता आणि ऐकता येत नाही. मग साऱ्यांना असा प्रश्न पडतो की इथ आपल्याला जे हवे आहे त्याची ऑर्डर द्यायची तरी कशी? पण यासाठीही होटेलच्या मालक सोनम कापसे यांनी एक वेगळी शक्कल लढवली आहे. त्यांनी एक विशेष मेनू डिजाइन केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला जे हवय त्याची ऑर्डर तुम्ही देवू शकता आणि ही मुले देखील हे विशेष साईन समजून घेतात. त्यासाठी त्यांना याच स्पेशल ट्रेनिंग दिले गेले आहे. त्यांच्याच सांकेतीक भाषेत हा विशेष मेनू तयार करण्यात आला आहे. दरम्यान, तुमच्या स्वागतापासून ते तुम्हाला सर्वोत्तम सेवा देण्यापर्यंत ही मूकबधिर मुले अतिशय सुंदर सेवा देत आहेत.
हेही वाचा - Katol To Nagpur Road : गडकरींनी मानले माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे आभार