ETV Bharat / city

डेल्टा प्लसवर कुठले संशोधन होत आहेत? मोनोक्लोनल अँटिबॉडीजचा परिणाम होतोय का?..पाहा व्हिडिओ - Delta Pulse Symptoms Information Dr Bhondwe

डेल्टा प्लसमुळे राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून निर्बध वाढवण्यात आले आहेत. डेल्टा प्लसबाबत अनेक शक्यता व्यक्त होत आहेत, त्यामुळे भारतात, तसेच जगात या विषाणूवर काय संशोधन सुरू आहे? त्यातून आता पर्यत काय समोर आले? याबाबत ईटीव्ही भारतने आढावा घेतला.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jun 29, 2021, 7:23 PM IST

Updated : Jun 30, 2021, 2:38 PM IST

पुणे - महाराष्ट्रासह भारतातल्या काही राज्यांत आता डेल्टा प्लस या नव्या कोरोना विषाणूची धास्ती दिसून येते आहे. या नव्या विषाणूचे काही रुग्ण देखील आढळून आल्याने राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून निर्बध वाढवण्यात आले आहेत. डेल्टा प्लसबाबत अनेक शक्यता व्यक्त होत आहेत, त्यामुळे भारतात, तसेच जगात या विषाणूवर काय संशोधन सुरू आहे? त्यातून आतापर्यंत काय समोर आले? याबाबत ईटीव्ही भारतने आढावा घेतला. डेल्टा प्लसबाबत आयएमए महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी माहिती दिली.

माहिती देताना डॉ. अविनाश भोंडवे

हेही वाचा - ...तर जुलै महिन्याचा पगार नाही - पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त

स्पाईक प्रोटीन म्युटेशन

कोरोना विषाणूच्या महामारीत दुसरी लाट ओसरत असताना डेल्टा प्लस, या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे चिंता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाली होती, ती डेल्टा नावाच्या कोरोनाच्या विषाणूमुळे. आणि हा डेल्टा व्हेरियंट असलेला विषाणू अत्यंत घातक होता. दुसऱ्या लाटेतील याच डेल्टा विषाणूमध्ये के ४५७ एन नावाच्या स्पाईक प्रोटीनमध्ये म्युटेशन झाले आणि डेल्टा प्लस विषाणू निर्माण झाला. दक्षिण आफ्रिकेमधल्या बीटा या विषाणूमध्येही याच पद्धतीने म्युटेशन होऊन डेल्टा प्लस हा विषाणू निर्माण झाला होता.

तापसण्यांची गरज

महाराष्ट्र्रात 5 मे ते 4 जून या काळात साडेसात हजार नमुने तपासण्यात आले. त्यात सुरवातीला 21 रुगण डेल्टा प्लसचे आढळून आले होते, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

संशोधन सुरू -

डेल्टा प्लसबाबत आता संशोधन केले जाते आहे. भारतात, महाराष्ट्रात त्याचप्रमाणे याचा अभ्यास जागतिक स्तरावरही करण्यात येत आहे. ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या संशोधनात केलेल्या तपासण्यात 63 रुग्ण सापडले होते. महाराष्ट्रात 5 मे ते 4 जून या काळातले नमुने तपासण्यात आले आणि ही संख्या साडेसात हजार नुमने इतकी होती. मात्र, त्याचवेळी नवीन रुग्णांची संख्या ज्यास्त होती. त्या तुलनेत डेल्टा प्लससाठी होणाऱ्या तपासण्या कमीच असल्याने या तपासण्या वाढवण्याची गरज असल्याचे आयएमए महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

लक्षणे कोणती -

भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकार संशोधन संस्थांबरोबर एकत्र येत यावर संशोधन करत आहे. ब्रिटनमध्येही याच्यावर सखोल संशोधन सुरू आहे आणि त्यांच्यानुसार प्रवासाची हिस्ट्री असलेल्या नागरिकांमध्ये हे डेल्टा प्लस व्हेरियंट आढळून आला आहे. त्यातही 20 ते 45 या वयोगटांत हा विषाणू अधिक आढळून आला आहे. त्या तुलनेत 60 किंवा त्यापेक्षा ज्यास्त वय असलेल्या नागरिकामध्ये मात्र हे प्रमाण कमी आहे, असे भोंडवे यांनी सांगितले.

या संशोधनात ज्यांनी लसीकरण केलेले नाही त्यांच्यात हा डेल्टा व्हेरियंट सापडण्याचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, या डेल्टा प्लसची लागण झालेली असली तरी मृत्यू मात्र झालेले नव्हते, असे आढळून आले. दुसऱ्या लाटेतील डेल्टा हा विषाणू पहिल्या लाटेतल्या सार्स विषाणूपेक्षा जवळजवळ 60 टक्के जास्त प्रमाणात बाधा करत होता, त्यामुळे आता या डेल्टा प्लस विषाणूची संक्रमक शक्ती किती आहे? याच्यावरही संशोधन सध्या सुरू आहे. त्याचप्रमाणे या विषाणूची बाधा झाल्यानंतर काही वेगळी लक्षणे आढळून येत आहेत का? याचा अभ्यास केला जात आहे. जसे पहिल्या लाटेच्या वेळची काही लक्षणे आणि दुसऱ्या लाटेतील काही लक्षणे वेगळी असतात, तसे या डेल्टा प्लस व्हेरियंटची लक्षणे काही वेगळी आहेत का? याचा अभ्यास केला जातो.

अँटिबॉडीजवर लक्ष

भारतातल्या एक संशोधनात काही बाबी आढळून आल्या. त्यानुसार मोनोक्लोनल अँटिबॉडीज या उपचार पद्धतीला भारत सरकारने परवानगी दिली आहे. या अँटिबॉडी रुग्णाला दिल्या तर रुग्ण बरा होतो, असे सुरवातीला दिसून येत होते, मात्र आता डेल्टा प्लस विषाणूवर सुरू असलेल्या संशोधनात या मोनोक्लोनल अँटिबॉडी उपचार पद्धतीचा असर होत नाही, असे आढळून येत आहे, असे डॉ. भोंडवे सांगतात. त्यामुळेच, सध्या जे लसीकरण सुरू आहे, त्यामुळे निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीजला हा डेल्टा प्लस विषाणू किती दाद देईल? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. तसेच, ज्यांना आधी कोरोना झालेला आहे, त्यांच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीजना डेल्टा प्लस किती दाद देईल? अशी ही शंका उपस्थित होते आहे. त्यामुळेच, डेल्टा प्लसबाबत अधिकाधिक संशोधन केले जाते आहे.

हेही वाचा - मावळमध्ये 8 वर्षांच्या मुलाच्या सेल्फीने घेतला वडिल-मामाचा बळी

Last Updated : Jun 30, 2021, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.