ETV Bharat / city

पंडित गाळगीळ यांनी सांगितले घटस्थापनेचे महत्व, पाहा व्हिडिओ... - ghatasthapana importance Pandit Gadgil

उद्यापासून सर्वत्र नवरात्र उत्सवाला सुरवात होत आहे. नवरात्रबरोबर येतो उत्साह आणि उत्सव. नऊ दिवसांच्या उत्सवात देवी दुर्गाच्या नऊ स्वरुपांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस सर्वात महत्त्वाचा असतो. कारण, त्या दिवशी घटस्थापना होते. घटस्थापना म्हणजे काय या बाबत ईटीव्ही भारतने पंडित वसंतराव गाळगीळ यांच्याकडून माहिती जाणून घेतली.

पंडित गाळगीळ घटस्थापनेचे महत्व
ghatasthapana importance Pandit Gadgil
author img

By

Published : Oct 6, 2021, 9:55 PM IST

पुणे - उद्यापासून सर्वत्र नवरात्र उत्सवाला सुरवात होत आहे. नवरात्रबरोबर येतो उत्साह आणि उत्सव. नऊ दिवसांच्या उत्सवात देवी दुर्गाच्या नऊ स्वरुपांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस सर्वात महत्त्वाचा असतो. कारण, त्या दिवशी घटस्थापना होते. घटस्थापना म्हणजे काय या बाबत ईटीव्ही भारतने पंडित वसंतराव गाळगीळ यांच्याकडून माहिती जाणून घेतली.

माहिती देताना पंडित गाळगीळ

हेही वाचा - शेतकऱ्यांना चिरडले गेल्यानंतरही पंतप्रधानांचे मौनच! मात्र, त्याचे मला आश्चर्य वाटत नाही -सुप्रिया सुळे

पंडित गाळगीळ म्हणाले..

घटस्थापनेचा शाब्दिक अर्थ म्हणजे घट वाढणे. नवरात्री दरम्यान इतर विधींमध्ये घटस्थापना सर्वात महत्त्वाची विधी आहे. घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते. घटस्थापना देवी शक्तीचे आव्हान आहे. ते नियम, मार्गदर्शक तत्वे आणि वेळ प्रदान करणाऱ्या शास्त्रानुसार केले पाहिजे. घट म्हणजे, कलश आणि कलश म्हणजेच वरुण देवता. सागर आणि नद्यांनी जे आपले विश्व भरले आहे, त्याची देवता म्हणजे वरुण देवता. वरुण देवता ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणाला आपण कलश म्हणतो. कोणत्याही देवाची पूजा ही कलश पूजेशिवाय होत नाही. कलशाच्या पूजेच्या वेळेस आपली श्रद्धा अशी असते की आपल्या पवित्र सगळ्या नद्या सगळी सागराची तीर्थ त्या घटात येऊन राहतात. घट म्हणजे मातीचा घडा. श्रीमंत लोकांनी तो सोने, चांदी, पितळेचा घडा केला. परंतु, माती ही सर्वात श्रेष्ठ आहे आणि तिचा घडवलेला घडा म्हणजे कलश आणि त्याची स्थापना करून सकाळी उठल्यावर सूर्योदयापासून तीन तासांच्या आत म्हणजेच, साडेसात ते साडेनऊमध्ये पाहिल्या प्रवर्गात सर्वांनी घटस्थापना करावी, अशी माहिती पंडित वसंतराव गाळगीळ यांनी दिली.

घटस्थापना म्हणजे काय ?

घटस्थापना म्हणजे, मातीचा एक गोलवर घोटा करायचा आणि त्यात हा कलश ठेवायचा. शक्यतो मातीचाच कलश ठेवायचा, कारण ती पृथ्वीची पूजा आहे, त्याची स्थापना करावी आणि मग त्यात आंब्याचा टाळा टाकायचे. पंचकल्ल टाकायचे, वर नारळ ठेवायचे. समोर महालक्ष्मी, महाकालीची मूर्ती ठेवायची आणि त्या घटाची पुजा करणे म्हणजे घटस्थापना. तो नऊ दिवस तेथून हलवायचा नाही. त्याला दररोज एक माळ सोडायची. नवरात्रीच्या नऊ माळा त्या नवदुर्गांच्या नावाने एक - एक दिवस सोडायचे, असे पंडित वसंतराव गाळगीळ यांनी सांगितले.

यंदा आठ दिवसच नवरात्र उत्सव

शक्तीच्या उपासनेचे पर्व म्हणजे, नवरात्र उत्सवाला उद्यापासून प्रारंभ होणार आहे. नवरात्र उत्सव आठ दिवसांचेच असणार आहे. दरवर्षी नवरात्रीचे नऊ दिवस आणि विजयादशमीचे दहा दिवस असतात, पण यंदा तिसरा दिवस आणि चौथा दिवस एकत्रच आला असल्याने यंदाचा नवरात्र उत्सव हा आठच दिवसाचा असणार आहे आणि नवव्या दिवशी दसरा असणार आहे, असेही गाळगीळ यांनी सांगितले.

हेही वाचा - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे तयारी पूर्ण; उद्या पहाटे 5 वाजता उघडणार मंदिर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.