ETV Bharat / city

Eid-ul-Fitr 2022 : रमजान ईद म्हणजे काय?; कशी साजरी करतात, वाचा सविस्तर...

मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याचा चंद्र आज ( 2 मे ) दिसला आहे. उद्या ( 3 मे ) देशभरात रमजान ईद म्हणजे ईद उल फितर ( Eid-ul-Fitr 2022 ) साजरी होणार आहे.

धर्मगुरू मौलाना नकी हसन
धर्मगुरू मौलाना नकी हसन
author img

By

Published : May 2, 2022, 10:28 PM IST

Updated : May 2, 2022, 10:43 PM IST

पुणे - मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याचा चंद्र आज ( 2 मे ) दिसला आहे. उद्या ( 3 मे ) देशभरात रमजान ईद म्हणजे ईद उल फितर साजरी ( Eid-ul-Fitr 2022 ) होणार आहे. सोमवारी महिन्याचा शेवटचा तिसावा उपवास ( रोजा ) करण्यात आला असून, उद्या देशभरात रमजान ईद उत्साहात साजरी होणार आहे.

धर्मगुरू मौलाना नकी हसन यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

यंदाची ईद निर्बंधमुक्त साजरी होणार - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 2 वर्ष निर्बंध असल्याने सर्वत्र सण उत्सव शासनाच्या नियमावलीमध्ये साजरे करावे लागले. पण, यंदा शासनाने नियमावलीत शिथीलता आणल्याने यंदाची ईद ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्याबाबतची तयारी देखील मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे.

महिनाभर कडक उपवास - गेल्या महिनाभर मुस्लिम बांधव रमजान महिन्याचे कडक उपवास करीत होते. पहाटे सहेरी करून सूर्यास्तानंतर इफ्तारी करत दिवसभराच्या निर्जल उपवास सोडला जात होता. त्याशिवाय विशेष नमाज पठण केली जात होती. कुराणाचे देखील पठण करीत अल्लाहचे नामस्मरण करून सुख, शांती बरोबर आयुष्यात येणारी संकटे दूर करण्याची दुआ मागण्यात आली.

ईदला देण्यात येणार सामाजिक संदेश - रमजानच्या दिवशी सकाळी सामूहिक ईदची नमाज पठण होणार आहे. त्यानंतर सर्वच मुस्लिम बांधव एकमेकांच्या गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा देत असतात. मशिदीत धर्मगुरू सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी तसेच एकात्मतेसाठी सामाजिक संदेश दिला जातो, अशी माहिती धर्मगुरू मौलाना नकी हसन यांनी दिली आहे.

हेही वाचा - Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने बाजारात होणार मोठी उलाढाल!

Last Updated : May 2, 2022, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.