पुणे - कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर देशभरात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. पण देशासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ओमायक्रोनच्या नवीन व्हेरीयंटने शिरकाव केला असून देशासह राज्यात मोठ्या प्रमाणत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकूणच पुन्हा एकदा कोरोनाचा वाढत आहे.
देशासह राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे BA4 आणि BA5 सब-व्हेरिएंटचा वेगाने प्रसार जरी होत असला तरी या वाढी मागील अजून देखील काही कारणे आहेत. ते म्हणजे प्रामुख्याने नागरिकांनी लासिकरणकडे केलेलं दुर्लक्ष, नागरिकांकडून काळजी न घेणे, मास्कचा वापर न करणे, जास्त प्रमाणात गर्दी करणे, असे अनेक कारणे या कोरोना वाढीच समोर आले आहेत.
ही आहे कारणे - पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणत नागरिक हे बाधित होत होते. नागरिकांच्या मनात भीती होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणत पाहिलं लसीकरण डोस घेण्यात आल. त्यानंतर ही काही नागरिकांकडून तसेच शासनाच्या आवहानानंतर दुसऱ्या डोससाठी नागरिक पुढे आले. पण त्याच वेळी तिसरी लाट ओसरली आणि निर्बंध शिथिल झाले आणि त्यामुळे ज्या प्रमाणात दुसऱ्या डोससाठी आणि बूस्टर डोससाठी नागरिक पुढे यायला पाहिजे होत, तेवढ्या प्रमाणत नागरिक पुढे आलेले नाही. तसेच जी काळजी पूर्वी नागरिकांकडून घेतली जात होती. तशी काळजीदेखील नागरिकांकडून घेतली जात नाही. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे BA4 आणि BA5 सब-व्हेरिएंटचा प्रसार वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे डॉ.उदय भुजबळ यांनी दिली आहे.
जवळजवळ 99 टक्क्याहून अधिक रुग्ण हे असिमटेमिक - सध्या जे नवीन व्हेरीयंटचे नवीन रुग्ण सापडत आहे. त्या रुग्णांना एक ते दोन दिवस ताप येणे, अंग दुखी, सर्दी, खोकला, अशी लक्षणे दिसून येत आहे. तर यात विशेष म्हणजे कोणीही जास्त प्रमाणत सिरयस झालेलं नाही. कोणालाही ऑक्सिजनची गरज लागणे, व्हेंटिलेटरची गरज लागणे अशी परिस्थीती निर्माण झालेली नाही. जवळजवळ 99 टक्के हून अधिक रुग्ण हे असिमटेमिक आहे. आणि ते रुग्ण होम आयसोलेशन मध्ये उपचार घेत आहे. परंतु यात ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे.ज्यांना आजार जास्त आहे.अश्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. असं देखील यावेळी डॉ उदय भुजबळ यांनी सांगितल.
असे रुग्ण देखील होत आहे बाधित - जे रुग्ण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत देखील पॉझिटिव्ह आले आहेत असे रुग्ण देखील या नवीन व्हेरीयंट मध्ये बाधित होत आहे.पण त्यांच्यातील जो आजार आहे तो अत्यंत माईल्ड स्वरूपाचा आहे. असं देखील यावेळी डॉ उदय भुजबळ यांनी सांगितले.
तिसऱ्या लाटेसारखी परिस्थिती होऊ शकते - जर येणाऱ्या काळात निर्बंधाच्या बाबतीत अशीच परिस्थिती राहिली तर जी परिस्थिती तिसऱ्या लाटेत निर्माण झाली होती तीच परिस्थिती या चौथ्या लाटेत ही होऊ शकते.अस देखील यावेळी डॉ उदय भुजबळ यांनी सांगितल.