ETV Bharat / city

Maharashtra SSC Result 2021 : दहावीच्या निकालाची साईट क्रॅश, निकाल पाहण्यात अडचणी - दहावीचा निकाल जाहीर

दहावीचा निकाल mahresults.nic.in, sscresult.mkcl.org आणि maharashtraeducation.com. या संकेतस्थळांवर जाहीर केला जाणार आहे. मात्र साईट क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Maharashtra SSC Result 2021 : दहावीच्या निकालाची साईट क्रॅश, निकाल पाहण्यात अडचणी

author img

By

Published : Jul 16, 2021, 1:57 PM IST

पुणे : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निकालाची वेबसाईट क्रॅश झाली आहे. दहावीचा निकाल mahresults.nic.in, sscresult.mkcl.org आणि maharashtraeducation.com. या संकेतस्थळांवर जाहीर केला जाणार आहे. मात्र साईट क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राज्याचा निकाल ९९.९५ टक्के

इतिहासात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या शैक्षणिक वर्षानंतर परीक्षेशिवाय अंतर्गत मूल्यमापनाद्वारे तयार केलेला दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यंदा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.९५ इतकी आहे.

कोकण विभाग अव्वल

सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच १००% इतका असून सर्वात कमी ९९.८४% निकाल नागपूर विभागाचा आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८२ हजार ८०२ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८२ हजार ६७४ विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी ७४६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९०.२५ आहे.

यंदाही विद्यार्थीनींचीच बाजी

निकालात यंदाही विद्यार्थीनींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल ९९.९६% असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ % आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.०२ % जास्त आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ % इतका लागला आहे.
हेही वाचा - SSC Result 2021 : दहावीत यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल, येथे बघा तुमचा निकाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.