पुणे - 21 तारखेला विधानसभेसाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी पाऊस मतदानावर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. 23 ऑक्टोबर पर्यंत राज्यभरात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, हे प्रमाण कायम राहिल्यास मतदानावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
22 आणि 23 ऑक्टोबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आली. राज्यभरात वर्तवण्यात आलेल्या पावसाच्या अंदाजामुळे मतदानाचा टक्का घसरू शकतो.
21 ऑक्टोबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच प्रशासनाकडून मतदानाच्या दिवशी पावसासाठी घेण्यात येणाऱ्या खबरदारीचे अद्याप कोणतोही चित्र स्पष्ट नसून, याबाबत संदिग्धता कायम आहे.