पुणे : सातारा-पुणे महामार्गावरील वेळू गावातील गादी कारखान्याला सोमवारी दुपारी मोठी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग विझवण्यासाठी आग्निशमन दल प्रयत्न करत आहे.
या गोदामात मोठ्या प्रमाणात कापूस आणि कापड असल्याने आग अधिकच भडकली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गावकरी आणि अग्निशामक दल यांच्याकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.