पुणे - राज्यात अनेक भागांमध्ये सध्या पुन्हा एकदा कोरोनाचे संकट डोके वर काढत आहे. कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासन कोरोना संदर्भातील नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करत आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांबाबत नियम अटी कायम आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेत शिवजयंतीसारखे उत्सवदेखील साधेपणाने कमी गर्दीत साजरे होत आहेत. असं असताना आज भाजपा युवा मोर्चातर्फे आयोजित युवा वॉरियर्स या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व्यतिरिक्त व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि जमलेल्या तरुण तरुणींना सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचा विसर पडला असल्याचे पाहायला मिळाले.
सोशल डिस्टनसिंगचा फज्जा-भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने पुण्यातील कोंढवा धावडे येथे युवा वॉरियर्स शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात तरुण तरुणांनी सहभाग घेतला होता. एकीकडे राज्यात पुन्हा कोरोना वाढत आहे. पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय अशी परिस्थिती आहे. दरम्यान, युवा वॉरियर्स कार्यक्रमात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं दिसून आलं आहे. सोशल डिस्टनसिंग, मास्क, अश्या सर्व नियमांचा फज्जा उडाला आहे.
पुण्यात भाजपा युवा मोर्चाचा कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन एकीकडे कोरोनाच्या संदर्भात आपण वेगवेगळे नियम करत असताना अशाप्रकारे मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. मात्र, हे करत असतांना सोशल डिस्टनसिंग पाळणे महत्त्वाचे ठरते. मात्र या कार्यक्रमात याचाच आभाव दिसून आला.
पुण्यात भाजपा युवा मोर्चाचा कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन हेही वाचा- ...अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, पालकमंत्री छगन भुजबळ