ETV Bharat / city

धक्कादायक : 16 वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य; आरोपी मित्राला अटक - पुणे न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित दांडेकर पूल येथे दुपारी दोनच्या सुमारास पीएमटी बस स्टॉपवर मित्रासोबत बोलत थांबला होता. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने पीडित मुलाला बळजबरीने ओढत फरफटत बस स्टॉपच्या पाठीमागील मुतारीत नेले. त्याठिकाणी त्याच्यासोबत बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले.

दत्तवाडी पोलीस ठाणे
दत्तवाडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 21, 2021, 1:47 PM IST

पुणे - पुण्यात विकृतीची हद्द पार केल्याची घटना घडली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मित्राला ओढत फरफटत नेऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील दत्तवाडीत घडली आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी 16 वर्षाच्या पीडित मुलाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सागर सोनावणे (वय 21 रा. दांडेकर पूल) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

16 वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य

बळजबरीने केलं अनैसर्गिक कृत्य -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित दांडेकर पूल येथे दुपारी दोनच्या सुमारास पीएमटी बस स्टॉपवर मित्रासोबत बोलत थांबला होता. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने पीडित मुलाला बळजबरीने ओढत फरफटत बस स्टॉपच्या पाठीमागील मुतारीत नेले. त्याठिकाणी त्याच्यासोबत बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले.

बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षणप्रमाणे गुन्हा दाखल -

पीडित मुलाने याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सोनावणे याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.