पुणे - सध्या आखड सुरू असून, शहरात विविध ठिकाणी पार्टी तसेच हॉटेलमध्ये वेगवेगळे ऑफर पाहायला मिळत आहे. शहरात अनेक दारु विक्रीची दुकाने आहेत. हे दुकानदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या ऑफरही देत असतात. पुणे जिल्ह्यातील लोणीकाळभोर परिसरात दारूसाठी एक आगळी वेगळी ऑफर एका हॉटेल चालकाने लावली ( unlimited liquor offers for students in loni kalbhor ) आहे. ती ऑफर पाहून पोलीस ही चक्रावले आणि थेट हॉटेल मालकालाच ताब्यात घेतलं. देवी प्रसाद सुभाष शेट्टी ( वय 33) असे अटक करण्यात आलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. पोलीस नाईक प्रदीप भीमराव क्षीरसागर यांनी याबाबत फिर्याद दिली ( pune police arrested one person ) आहे.
लोणी काळभोर हद्दीतील कदमवस्ती येथे द टीप्सी टेल्स परमिट रुम हे हॉटेल आहे. या हॉटेलचे मालक शेट्टीने त्या परिसरात असलेल्या एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आकर्षिक करण्यासाठी चक्क 799 रुपयांता अनलिमिटेड दारु असा बोर्ड लावला. मात्र, लोणी काळभोर पोलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हॉटेल चालकाला ताब्यात घेतले आहे.
या बोर्डबाबत पोलिसांनी द टीप्सी टेल्स हॉटेलच्या मालकाला विचारणा केली. तेव्हा त्याने सांगितलं की, मुलांना आपल्या हॉटेलकडे आकर्षित करण्यासाठी व व्यवसायाची विक्री वाढवण्यासाठी आपण हा बोर्ड लावला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमनुसार मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंचं बंड, उद्धव ठाकरे रणांगणांत; शिवसेनेच्या बांधणीसाठी 20 दिवसांत 13 बैठका