पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेदांत फॉक्सकाँन प्रकल्पावरून सत्ताधारी तसेच विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होत आहे. आता याच प्रकल्पावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली (Nirmala Sitharaman criticized over Vedanta project) आहे. आत्ता विरोधक वेदांत प्रकल्प बाहेर गेल्याने रडत आहे. पण त्यांनी सर्वप्रथम याच उत्तर द्यावं की, केंद्रातील 4 मोठे प्रकल्प राज्यात येऊ का दिले नाही ? महाविकास आघाडी सरकार याला जबाबदार आहे. अशी टीका यावेळी निर्मला सीतारामन यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली (Nirmala Sitharaman criticized the MVA government) आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आज पुण्यातील विधान भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत (Nirmala Sitharaman criticized in Pune)होत्या. पुढे त्या म्हणाल्या की, नानार सारखा प्रकल्प ज्यामुळे आशियामध्ये सर्वात मोठी ऑईल रिफायनरी होणार होती, त्याला कोणी थांबवलं ? तसेच आरे मेट्रो कारशेट सारख्या प्रकल्पाला कोणी थांबवलं ? मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प कोणी थांबवला ? सर्वांना माहित आहे की, हा जर प्रकल्प झाला असता तर याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले असते, म्हणून हा प्रकल्प थांबवण्यात आला आहे. आज राज्यातून एक प्रकल्प गेल्याने विरोधक आरडाओरडा करत आहे. पण देशातील प्रमुख चार प्रकल्प कोणी थांबवले ? याचे उत्तर महाविकास आघाडीने द्यावे मगच आम्हाला प्रश्न विचारावं.
सहकार क्षेत्रासाठी वेगळं मंत्रालय नरेंद्र मोदींनी बनवलं - यावेळी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी पवार यांना टोला लगावत म्हटलं, की सहकार क्षेत्राला राजकीय पोळी शेकनाऱ्यांपैकी कोणीही वेगळं मंत्रालय बनविण्यासाठी प्रयत्न केला नाही. सहकार क्षेत्रासाठी वेगळं मंत्रालय फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवलं. राज्यात मोठ्या प्रमाणात सहकार क्षेत्र असून सहकार क्षेत्र राजकीय करू नये, असे सांगणारे लोकांनी आजपर्यंत कोणताही मंत्रालय बनविले नाही. अशी टीका देखील यावेळी सीतारामन यांनी (Union Finance Minister Nirmala Sitharaman) केली.
रुपयाने डॉलरच्या तुलनेत चांगली पकड घेतली - सध्या देशातील डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरांमध्ये घट झाली आहे. याबाबत सीतारामन यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, आमच्या करन्सीबाबत चांगली पकड आहे. बाकीच्या देशाच्या चलनाच्या तुलनेत रुपयाने डॉलरच्या तुलनेत चांगली पकड घेतली आहे. अर्थमंत्रालय या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. असं यावेळी सीतारामन (Nirmala Sitharaman over Vedanta Project) म्हणाल्या.