ETV Bharat / city

...तर मोदींची जागा संसदेत नाही तर प्राणिसंग्रहालयात हवी

२०१४ नंतर गुजरातचा वाघ दिल्लीच्या संसदेत बसला आणि पंतप्रधान झाला. मात्र, आम्हाला वाघ नको होता. आम्ही तर एक माणूस मागितला होता, असे उमर खालिद यांनी पुण्यातील भाषणात म्हटले.

umar Khalid and Narendra Modi
उमर खालिद आणि नरेंद्र मोदी
author img

By

Published : Jan 18, 2020, 1:36 PM IST

पुणे - सीएए, एनआरसी, एनपीआर आणि धर्मनिरपेक्षता या विषयांवर 'संविधान बचाव समिती' पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना संबोधीत करताना, विद्यार्थी नेता उमर खालिद याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली. मोदी जर 'शेर' असतील तर त्यांची जागा संसद नाही तर 'चिडियाघर' आहे, असे खालिद यांनी म्हटले आहे.

... तर मोदींची जागा संसद नाही तर 'चिडियाघर'... उमर खालिद यांची टिका

हेही वाचा... ...म्हणे, 'मोहम्मद अली रस्त्यावर माझ्यासोबत होता हाजी मस्तान'

काय म्हणाले उमर खालिद ?

'२०१४ च्या आधी एक घोषणा दिली जात होत होती. ‘देखो देखो कोण आया गुजरात का शेर आया’ २०१४ नंतर गुजरातचा वाघ दिल्लीच्या संसदेत बसला आणि पंतप्रधान झाला. मात्र आम्हाला वाघ नको होता. आम्ही तर एक माणूस मागितला होता. वाघ माणसांना खाऊन टाकतो. जर गुजरात येथील हा 'नमुना' वाघ आहे. तर त्यांची जागा संसद नाही चिडीयाघर आहे', असे बोलत उमर खालिद यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

याच्यापुढे बोलताना खालिद यांनी, आम्हाला शेर नाही तर माणूस हवा होता, असे म्हटले. ज्या माणसाकडे डोक्यासहीत हृदय देखील असतं. तो माणूस आम्हाला हवा होता, असे बोलत उमर खालिद यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा... सरसंघचालक मोहन भागवत नवीन संविधान बनवत असल्याचा प्रचार खोटा; नागपुरात गुन्हा दाखल

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.