पुणे - राज्यातील पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश बारावीच्या गुणांवर होणार असून, त्यासाठी प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी स्पष्ट केले. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये पुरेशा जागा उपलब्ध आहेत. मात्र, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी महाविद्यालयांना प्रवेश क्षमता वाढवून देण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.
राज्य परीक्षा मंडळाने बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनानुसार जाहीर केल्याने निकालाची टक्केवारी वाढली. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर आर्टस्, सायन्स, कॉमर्स अशा पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेण्याबाबतची चाचपणी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून करण्यात येत होती. मात्र, पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया बारावीच्या गुणांवरच होणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक झाल्यानंतर सामंत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली. सामंत म्हणाले की, पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी परीक्षा घेण्यास आता पुरेसा अवधी नाही. त्यामुळे बारावीच्या गुणांनुसारच प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया सुरू करता येईल. बारावीचा निकाल वाढल्यामुळे जागा कमी पडत असल्यास, महाविद्यालयांच्या मागणीनुसार प्रवेशक्षमता वाढवून देण्यात येईल. त्यासाठी महाविद्यालयांनी तातडीने प्रस्ताव पाठवावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याची सूचनाही देण्यात आली आहे. सीईटी सेलकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटींना २६ ऑगस्टपासून सुरुवात होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा (सीईटी) घ्यायची असल्यास त्यांना ती घेता येऊ शकेल. मात्र, महाविद्यालयांना ही प्रवेश प्रक्रिया कमी कालावधीत पूर्ण करावी लागणार आहे. ही सुविधा केवळ स्वायत्त महाविद्यालयांना राहणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठ अनुदान मंडळाच्या (यूजीसी) वेळापत्रकानुसार, नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा विचार आहे. त्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करुन, नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, जिल्ह्यातील करोना संसर्गाची स्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता दिली जाईल. त्यामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठांअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी परिस्थिती असल्यास त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता द्यायची की नाही हे ठरवले जाईल. त्यासाठी तंत्रशिक्षण विभागाचे; तसेच उच्चशिक्षण विभागाचे संचालक संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आठ दिवसांत निर्णय घेतील. महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करताना विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करता येईल का, याचाही प्रयत्न असल्याचे सामंत यांनी सांगितले.
बारावीच्या गुणांवरच मिळणार पदवीच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमाला प्रवेश, उदय सामंत यांची घोषणा - पदवी अभ्यासक्रम प्रवेश
राज्यातील पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश बारावीच्या गुणांवर होणार असून, त्यासाठी प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी स्पष्ट केले. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये पुरेशा जागा उपलब्ध आहेत.