ETV Bharat / city

नशिबाचा खेळ ; ताटातूट झालेल्या बहिणींची 32 वर्षांनी भेट, एक बुधवार पेठेत तर दुसरी राहते स्वीडनला - पुणे

स्वीडनहून आईच्या शोधात आलेल्या 32 वर्षीय तरुणीला आई तर मिळाली नाही, कारण तिचं निधन झालं होतं. मात्र तिला तिची बहीण मिळाली. या बहिणींची भेट तब्बल ३२ वर्षानंतर झाल्याने दोघींनीही आश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

बहिणींची भेट
author img

By

Published : May 30, 2019, 12:05 AM IST

Updated : May 30, 2019, 4:00 PM IST

पुणे - ताटातूट झालेल्या बहीण-भावांची खूप वर्षांनी भेट झाल्याचं काही चित्रपटात आपण पाहिलं आहे. कथा-कादंबरीत असं वाचलंही आहे. मात्र पुण्याच्या बुधवार पेठेत प्रत्यक्षात ही घटना घडली आहे. स्वीडनहून आईच्या शोधात आलेल्या 32 वर्षीय तरुणीला आई तर मिळाली नाही, कारण तिचं निधन झालं होतं. मात्र तिला तिची बहीण मिळाली. एक बहीण बुधवारपेठेत तर दुसरी स्वीडनला राहणाऱ्या या बहिणींच्या भेटीनं दोघींच्याही डोळ्यातून आश्रू तरळले.

माहिती देताना सामाजिक संस्थेच्या संचालिका

महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यातील महिला कामानिमित्त पुण्यात आली, पण दुर्दैवाने ती वेश्याव्यवसायात ओढली गेली. ससून रुग्णालयात 32 वर्षांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला. परंतु त्या मुलीचा सांभाळ करण्याइतपत परिस्थिती नसल्यामुळं तिला पुण्यातील एका संस्थेला सोपवलं. या संस्थेनं या मुलीला स्वीडनच्या एका दाम्पत्याला दत्तक दिलं. दत्तक देताना काही कागदपत्रं त्या दाम्पत्याला देण्यात आले होते.

या मुलीचं नाव नेहा, तर स्वीडनमधील नाव होलनग्राम आहे. तिचं लग्नही झालं आहे. आपल्या पत्नीचं कोणी नातेवाईक जिवंत आहेत का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न तिच्या पतीनं केला. यासाठी त्यांनी एका एनजीओची मदत घेतली. यावेळी तिची बहीण जिवंत असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर तिला भेटण्यासाठी होलनग्राम पुण्यात आली. एका सामाजिक संघटनेच्या मदतीनं हा योग जुळून आला.

नेहाची बहीण तिच्यापेक्षा मोठी आहे. पुण्याच्या बुधवार पेठेत ती वेश्याव्यवसाय करते. मात्र खरच या दोघी बहिणी आहेत का, याची खात्री करण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. आवश्यक ती परवानगी घेऊन ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतर नेहा परत स्वीडनला जाणार आहे. पुण्यात या दोघींची आज भेट झाली तेव्हा, त्यांनी दोघींना कडकडून मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यातून अश्रू वाहायला लागले.

Intro:ताटातूट झालेल्या सख्ख्या बहिण-भावांची खूप वर्षांनी भेट झाल्याचे काही चित्रपटात आपण पाहिले असेल किंवा एखाद्या कथा कादंबरीत वाचले असेल. परंतु पुण्याच्या बुधवार पेठेत प्रत्यक्षात ही घटना घडली. स्वीडनहून आईच्या शोधात आलेल्या एका 32 वर्षीय महिलेला आई तर मिळाली नाही, कारण तिचे निधन झाले होते. या सर्व प्रवासात तिला तिची सख्खी बहीण मात्र मिळाली.

खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यातील एक महिला कामानिमित्त पुण्यात आली पण दुर्देवाने ती वेश्याव्यवसायात ओढली गेली. ससून रुग्णालयात 32 वर्षांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला. परंतु त्या मुलीचा सांभाळ करण्याइतपत परिस्थिती नसल्यामुळे तिला पुण्यातील एका संस्थेला सोपवले. या संस्थेने या मुलीला स्वीडनच्या एका दाम्पत्याला दत्तक दिले. दत्तक देताना काही कागदपत्रे त्या दाम्पत्याला देण्यात आले होते. Body:या मुलीचं नाव नेहा तर स्वीडनमधील नाव होलनग्राम आहे. तिचे लग्नही झालं आहे. आपल्या पत्नीचे कोणी नातेवाईक जिवंत आहेत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न तिच्या पतीने केला. यासाठी त्यांनी एका एनजीओची मदत घेतली. यावेळी तिची बहीण जिवंत असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर तिला भेटण्यासाठी होलनग्राम पुण्यात आलीय. एका सामाजिक संघटनेच्या मदतीने हा योग जुळून आला.Conclusion:नेहाची बहीण तिच्यापेक्षा मोठी आहे. पुण्याच्या बुधवार पेठेत ती वेश्याव्यवसाय करते. मात्र खरच या दोघी सख्या बहिणी आहेत का याची खात्री करण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. आवश्यक ती परवानगी घेऊन ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतर नेहा परत स्वीडनला जाणार आहे. पुण्यात या दोघींची आज भेट झाली तेव्हा त्यांनी दोघींना कडकडून मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यातून अश्रू वाहायला लागले.
Last Updated : May 30, 2019, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.