ETV Bharat / city

Kirit Somaiya Attack Case : भाजपनेते किरीट सोमय्या हल्ला प्रकरण, दोन पोलिसांचे निलंबन - Kirit Somaiya Attack Case

भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. किरीट सोमय्या पुन्हा पुणे महापालिकेत भेट देणार आहेत. यावेळी भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

Kirit Somaiya Attack Case
किरीट सोमय्या हल्ला प्रकरण
author img

By

Published : Feb 11, 2022, 2:50 PM IST

Updated : Feb 11, 2022, 3:35 PM IST

पुणे - महापालिकेत भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आज किरीट सोमय्या पुन्हा पुणे महापालिकेत भेट देणार आहेत. यावेळी भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्या सत्कारास विरोध केला आहे. पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई दिलीप नारायण गोरे आणि सतीश ज्ञानदेव शिंदे या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना या २ कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल आहे. दिलीप गोरे आणि सतीश शिंदे पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्थानकात गोपनीय विभागात कार्यरत आहेत. सोमय्यांना धक्काबुक्की प्रकरणात कामात हलगर्जीपणा केल्यामुळे दोघा पोलिसांचे निलंबन करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे.

काय आहे प्रकरण

जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेत आले होते. ते जुन्या इमारतीच्या मेनगेटने पायऱ्यांवरून जात असताना अचानक इमारतीच्या आतमधून शिवसेनेचे कार्यकर्ते बेकायदेशीर जमाव जमवून तेथे आले. त्यांनी सोमय्या यांना आत जाण्यापासून रोखले. एकाने त्याच्या अंगातील शर्ट काढून तो हवेत भिरवला व त्या शर्टने सोमय्या यांना फटका मारला. त्यानंतर सोमय्या यांची कॉलरपकडून हाताने जोर लावून खेचले व त्यांच्या जिवाला धोका होईल अशा पद्धतीने तिसऱ्या पायरीवरून ओढले. त्यामुळे सोमय्या पडले व त्यांच्या हाताला व डोक्याला मार लागला. त्यानंतर सोमय्या यांच्या गाडीसमोर शहरअध्यक्ष मोरे हे झोपले. तर, इतर कार्यकर्ते यांनी गाडीवर हाताने व बुक्यांनी मारहाण केली. हातात दगड घेऊन सोमय्या यांच्या जिवास धोका पोहचविण्यास उद्देशाने थांबले होते, असे तक्रारीत म्हटले आहे.

सर्व शिवसैनिकांना जामीन मंजूर

भाजप नेते किरीट सोमैयांना पुणे महापालिकेत धक्काबुक्की करण्यात आली होती. ( Attack on Kirit Somaiya in PMC ) या प्रकरणात गुन्हा दाखल असलेले 8 शिवसैनिक स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाले होते. ( Shivsainik present in Shivaji Nagar police station ) त्यानंतर या सर्व शिवसैनिकांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या या शिवसैनिकांना तीन हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे.

Last Updated : Feb 11, 2022, 3:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.