पुणे - पुण्यातील कोंढवा परिसरातून बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. सख्खा बापच स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलींवर तीन वर्षांपासून बलात्कार करत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ माजली आहे. पीडित मुलींच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांनी या 43 वर्षीय नराधम बापाला अटक केली आहे. त्याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी 43 वर्षे वयाचा आहे. कोंढवा परिसरात तो पत्नी आणि चार मुलींसह राहतो. त्याच्या दोन मुली नऊ वर्ष वयाच्या आहेत. मागील तीन वर्षांपासून तो या दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार करत होता. याविषयी कुठे वाच्यता केल्यास पत्नी आणि चारही मुलींना जीवे मारण्याची धमकी देत होता. त्याच्या या धमकीमुळे पत्नी आणि मुली याविषयी बोलण्यास घाबरत होत्या.
दरम्यान, कोंढवा परिसरातील एका वकीलाला हा सर्व प्रकार समजला होता. त्याने फिर्यादी महिलेला विश्वासात घेत धीर दिला आणि पोलिसात तक्रार देण्यासाठी सांगितले. त्यानंतर फिर्यादी महिलेने कोंढवा पोलीस स्टेशन गाठत स्वतःच्या पतीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनीही तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या. अधिक तपास कोंढवा पोलीस करीत आहे.
बाप लेकीच्या नात्याला काळीमा, नराधम बापाकडून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार - girl rape by father
पुण्यातील कोंढवा परिसरात बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथे बापानेच पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर मागील तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.