ETV Bharat / city

TET Result Scam : पाचशे जणांचे निकाल बदलले, दोघे अटकेत - पुणे पोलीस आयुक्त - Sukhdev dere

शिक्षक पात्रता परिक्षा 2018 निकालात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी ( TET Result Scam ) राज्य परिक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरेसह ( Sukhdev dere ) जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीचा तत्कालीन मॅनेजर अश्विन कुमार ( Ashvin Kumar ) दोघांना अटक करण्यात आली आहे. पाचशे अपात्र परिक्षार्थींकडून प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपये घेऊन निकाला फेरफार करुन पात्र दाखवल्याचा गुन्हा सायबर पोलीस ठाण्यात दाखल आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
author img

By

Published : Dec 21, 2021, 4:51 PM IST

Updated : Dec 21, 2021, 8:32 PM IST

पुणे - सध्या राज्यभर गाजत असलेला टीईटी परीक्षेतील ( TET 2018 ) गैरव्यवरहार प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. संगनमताने निकालात फेरफार केल्याप्रकरणी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीचा तत्कालीन मॅनेजर अश्विन कुमार ( Ashvin Kumar ) आणि परीक्षा विभागाचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे ( Sukhdev dere ) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पाचशे परिक्षार्थीकडून प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपये घेऊन जमा झालेले पैसे आपसात वाटून निकालात फेरफार करत परिक्षार्थी व शासनाची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

माहिती देताना पोलीस आयुक्त

पोलिसांनी चौकशीनंतर शिक्षण आयुक्तांना दिली लेखी माहिती

सायबर पोलीस पुणे शहर ( Cyber Cell ) येथे म्हाडा पेपर फुटी ( MHADA Paper Leak ) प्रकरणी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख व त्याचे साथिदार एजंट संतोष हरकळ व अंकुश हरकळ हे अटकेत आहेत. तसेच शिक्षक पात्रता परीक्षा 2019-2020 ( TET 2019-2020 ) संबंधी गुन्ह्यातील अटक अभिषेक सावरीकर अटकेत आहे. या सर्वांकडे पुणे पोलिसांनी ( Pune Police ) कसून चौकशी केली असता 2018 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा ( TET 2018 ) मध्येही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्तांसह परीक्षांचे आयोजन करणारे जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. बंगळुरुचे तत्कालीन व्यवस्थापक व त्याचे सहकारी यांच्या संगनमताने अपात्र परिक्षार्थ्यांकडून पैसे स्वीकारुन परिक्षेच्या निकालात फेरफार करुन पात्र दाखविल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी राज्या शिक्षण आयुक्तांना लेखी कळवले होते.

परिक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी केली तक्रार

पोलिसांनी महाराष्ट्र राज्य शिक्षणायुक्तांना लेखी कळवले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी तक्रार दिली. त्यानुसार 2018 साली शिक्षक पात्रता परिक्षा ( TET ) जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीने आयोजित केली होती. या परिक्षेचा अंतिम निकाल 12 ऑक्टोबर, 2018 रोजी जाहीर झाला होता. मात्र, त्या निकालापूर्वी जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापक अश्विन कुमारने परिक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुखदेव डेरे, तुकाराम सुपे व त्यांच्या सहकारी प्रितीश देशमुख, अभिषेक सावरीकर, सौरभ त्रिपाठी, संतोष हरकळ व अंकुश हरकळ या सर्वांच्या संगनमताने अपात्र असल्येल्या 500 परिक्षार्थींकडून प्रत्येकी सुमारे 50 ते 60 हजार रुपये स्वीकारले. ती रक्कम आपसात वाटून घेत खोटा निकाल प्रसिद्ध करुन परिक्षार्थी व शासनाची फसवणूक केली, अशी तक्रार राज्य परिक्षा परिषदेचे अध्यक्ष जगताप यांनी दिली.

गुन्हा दाखल, दोघांना अटक

जगताप यांच्या तक्रारीनुसार सायबर पोलीस ठाण्यात ( Cyber Police Station ) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील सुखदेव डेरे ( वय 61 वर्षे, रा. संगमनेर, जि. अहमदनगर ) व अश्विन कुमार ( वय 49 वर्षे, कल्याणी नगर, बंगळुरु ), या दोघांना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजूरकर व त्यांच्या पथकाने अटक केली आहे, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

हे ही वाचा - Pimpari Chinchwad Crime : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या 'गुन्हेगारी मुक्त पिंपरी-चिंचवड' संकल्पनेला तडा?

Last Updated : Dec 21, 2021, 8:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.