ETV Bharat / city

पुण्यातील 'त्या' निष्पाप जीवाच्या खुनाला अडीच वर्षानंतर फुटली वाचा, दोघे अटकेत - मृतदेह जंगलात फेकून दिला

बाळाला अनाथ आश्रमात ठेवतो, असे सांगून घेऊन गेलेल्या बापाने तेरा दिवसाच्या चिमुकल्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात फेकून दिला. एखाद्या चित्रपटातील कथा शोभावी असा हा प्रकार तब्बल अडीच वर्षानंतर उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

ि
f
author img

By

Published : Sep 18, 2021, 7:38 PM IST

पुणे - बाळाला अनाथ आश्रमात ठेवतो, असे सांगून घेऊन गेलेल्या बापाने तेरा दिवसाच्या चिमुकल्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात फेकून दिला. एखाद्या चित्रपटातील कथा शोभावी असा हा प्रकार तब्बल अडीच वर्षानंतर उघडकीस आला आहे. मुंढवा पोलिसांनी या प्रकरणी बाळाच्या बापासह दोघांना अटक केली.

शुभम महेश भांडे (वय 23 वर्षे) आणि त्याचा मित्र योगेश सुरेश काळे (वय 26 वर्षे), अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी एका 25 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी शुभम आणि तक्रारदार तरुणी एकाच कंपनीत काम करत असताना दोघांची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर 2017 पासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. यातून तक्रारदार तरुणीला गर्भधारणा झाली. तरुणीने आरोपी शुभमला ही माहिती दिल्यानंतर लवकरच आपण लग्न करूयात, असे सांगून तिला ससून रुग्णालयात ऍडमिट केले. तिथे पती म्हणून स्वतःचे नाव तिच्या नावासमोर लावले. त्यानंतर तरुणीने 14 मार्च, 2019 रोजी एका बाळाला जन्म दिला.

त्यानंतर ससून रुग्णालयातून त्यांनी 26 मार्च रोजी डिस्चार्ज घेतला. दोघेही बाळाला घेऊन केशवनगर, मुंढवा येथील घरी आले. घरी आल्यानंतर बाळाला आपण इतक्यात सांभाळू शकत नाही. त्याला अनाथ आश्रमात ठेवूया, असा प्रस्ताव त्याने शुभमने तरुणीसमोर ठेवला. तरुणीचा विरोध असतानाही आरोपीने मित्राच्या मदतीने 27 मार्च, 2019 रोजी बाळाला घेऊन गेला. त्यानंतर घरी येऊन बाळाला आश्रमात दिले असल्याचे सांगितले आणि ते पुन्हा एकत्र राहू लागले.

या सर्व प्रकारानंतर आरोपी शुभमने पीडित मुलीसोबत लग्न करण्यास नकार दिला. तर दुसऱ्याच एका मुलीसोबत त्याचा विवाह ठरला होता. त्यांचा साखरपुडाही झाला होता. याची माहिती पीडित मुलीला समजल्यानंतर तिने या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुंढवा पोलिसांनी आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये 'स्पा सेंटर'च्या नावाखाली तरुणींकडून वेश्या व्यवसाय; चार तरुणीची सुटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.