पुणे: गेली 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे केल्या गेले. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, सर्वच सण उत्सव हे निर्बंधमुक्त साजरे होत आहे. पुणे शहरात Pune city Ganpati गणेशोत्सवाची लगबग आत्ता पासूनच सुरू झाली आहे. यंदाचा गणेशोत्सव हा निर्बंध मुक्त होणार असून, गणेश मंडळे हे आत्तापासूनच तयारीला लागले आहे. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील मानाच्या पाचही गणेश मंडळाचा इतिहास आपण पाहणार आहोत. त्यापैकी तुळशीबाग Tulsi Baug Ganpati सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा मानाचा चौथा गणपती आहे. काय आहे, इतिहास व परंपरा या तुळशीबागेतील (Fourth Ganapati History and Traditions गणपतीची चला तर मग बघुया
श्री तुळशीबाग गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा मानाचा चौथा गणपती आहे. या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली. १९७५ मध्ये, पहिल्यांदा फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्याचा मान या मंडळाला जातो. तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या भागात हा गणपती बसतो. १३ फुट उंचीची ही गणेशमुर्ती अतिशय आकर्षक आणि मनाला भावनारी आहे. या गणपतीला ८० किलो वजनाचे चांदीची आभुषणे आहेत. कलाकार डी.एस. खटावकर गेल्या अनेक वर्षांपासुन, या गणपतीची सजावट करतात.
यावर्षी देखील मंडळाकडून देखावा सादर केल्या जाणारा आहे. तसेच विविध सामाजिक उपक्रम या मंडळाकडून राबवले जातात. दरवर्षीपेक्षा यावर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जाणार आहे. त्यामुळे तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात देखील, मोठा उत्साहाने उत्सव साजरा केला जाणार आहे.