पुणे - विभागातील 5 लाख 87 हजार 121 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 6 लाख 14 हजार 969 इतकी आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 11 हजार 532 इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 311 रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाला असून, मृत्यूचे प्रमाण 2.65 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱया रुग्णांचे प्रमाण 95.47 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 4 लाख 4 हजार 948 रुग्णांपैकी 3 लाख 86 हजार 506 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण 9 हजार 313 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.25 टक्के इतके आहे तर बरे होणाऱया रुग्णांचे प्रमाण 95.45 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 58 हजार 422 रुग्णांपैकी 55 हजार 600 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 973 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 849 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 52 हजार 779 रुग्णांपैकी 50 हजार 80 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 866 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 833 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 48 हजार 445 रुग्णांपैकी 46 हजार 552 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 136 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 50 हजार 370 रुग्णांपैकी 48 हजार 383 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 244 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 743 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 737 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 451, सातारा जिल्ह्यात 137, सोलापूर जिल्ह्यात 99, सांगली जिल्ह्यात 17 तर कोल्हापूर जिल्ह्यात 33 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.