ETV Bharat / city

टमाट्यांना कवडीमोल दर, शेतकरी आर्थिक संकटात

जानेवारी ते मार्चदरम्यान टमाट्यांची आवक कमी असते. असे असतानाही बाजारात टमाट्यांचे दर गडगडले आहेत. त्यामुळे जुन्नरमधील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

टमाट्यांना कवडीमोल दर, शेतकरी आर्थिक संकटात
टमाट्यांना कवडीमोल दर, शेतकरी आर्थिक संकटात
author img

By

Published : Feb 4, 2021, 8:59 AM IST

जुन्नर(पुणे) : किरकोळ आणि ठोक बाजारातही टमाट्यांचे दर गडगडल्याने जुन्नरमधील टमाटे उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दर नसल्याने टमाटे काढणीचाही खर्च निघत नसल्याने टमाटे शेतातच सडू लागल्याचे चित्र इथे बघायला मिळत आहे.

टमाट्यांना कवडीमोल दर, शेतकरी आर्थिक संकटात

आवक कमी तरीही बाजारभाव कवडीमोल
जुन्नर तालुक्यात टमाट्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. टमाट्यांसाठी नारायणगाव बाजार समितीत मोठी बाजारपेठ आहे. या बाजार समितीतून संपुर्ण देशभरात टमाटे पाठविले जातात. जानेवारी ते मार्चदरम्यान टमाट्यांची आवक कमी असते. असे असतानाही बाजारात टमाट्यांचे दर गडगडले आहेत. त्यामुळे जुन्नरमधील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

दर नसल्याने टमाटे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे

टमाटे काढणीचाही खर्च निघेनाटमाटे पिकाला एकरी 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च येतो. त्यातच वातावरणातील बदलांमुळे रोगराईचे संकट उभे राहते. यावर मात करत योग्य व्यवस्थापनातून शेतकऱ्यांनी टमाट्यांचे चांगले उत्पादन घेतले. मात्र दर नसल्याने टमाटे तोडणीचाही खर्च निघत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जगायचे तरी कसे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
शेतातच टमाट्यांचा लाल चिखल झाल्याचे चित्र जुन्नरमध्ये दिसत आहे

शेतातच टमाट्यांचा लाल चिखललॉकडाऊननंतर चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यामुळे टमाट्यांचे मोठे नुकसान झाले. त्यातुनही उभारी घेऊन शेतकरी शेतात कामाला लागला. मात्र दर नसल्याने टमाटे शेतातच सडत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतातच टमाट्यांचा लाल चिखल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.