ETV Bharat / city

'एल्गार' प्रकरणात पुण्यातील आणखी तिघांना एनआयएने केली अटक - एल्गार परिषद प्रकरण बातमी

पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी पार पडलेल्या एल्गार परिषद आयोजनात नक्षलवादी संबंध असल्याच्या कारणावरून आतापर्यंत देशभरातून तब्बल 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

elgaar
एल्गार
author img

By

Published : Sep 8, 2020, 2:56 PM IST

Updated : Sep 8, 2020, 3:04 PM IST

पुणे - एल्गार परिषद प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा)पुण्यातील आणखी तिघांना अटक केली आहे. सोमवारी रात्री सागर गोरखे, रमेश गायचोर यांना तर मंगळवारी ज्योती जगताप हिला अटक केली आहे. हे तिघेही कबीर कला मंच या संघटनेशी संबंधित आहे. शहरी नक्षलवादी संघटनेशी संबंधित ही संस्था असल्याचे सांगितले जाते.

पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी पार पडलेल्या एल्गार परिषद आयोजनात नक्षलवादी संबंध असल्याच्या कारणावरून आतापर्यंत देशभरातून तब्बल 12 जणांना अटक करण्यात आली आहे. भीमा कोरोगाव येथील लढाईस 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नक्षलवादी संघटनांनी आर्थिक पुरवठा करण्यासोबतच लोकांना चिथावणी दिल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.

या परिषद आयोजनात रमेश गायचोर आणि सागर गोरखे यांनी प्रमुख भूमिका पार पाडली होती. त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रारदार तुषार दामगुडे यांनी यापूर्वी तक्रार दिली होती. या प्रकरणात यापूर्वी सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गौतम नवलाखा, कवी वर हिरा राव, वर्णन गोन्साल्विस, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, सोमा सेन, सुधीर ढवळे, महेश राऊत, आनंद तेलतुंबडे, हनी बाबू यांना अटक करण्यात आली.

Last Updated : Sep 8, 2020, 3:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.