ETV Bharat / city

Thief travels UP to Pune Burglary : पुण्यात घरफोडी तर युपीमध्ये वस्तूंची विक्री.. चोरांचा अजब कारभार - पुणे पोलिस गुन्हे शाखा

उत्तर प्रदेशामधून विमानाने येऊन पुण्यात घरपोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना (Thief travels UP to Pune Burglary) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या (Pune Police arrested thief) ठोकल्या आहेत.

pune Police
pune Police
author img

By

Published : Dec 24, 2021, 10:18 AM IST

पुणे - उत्तर प्रदेशामधून विमानाने येऊन पुण्यात घरपोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना (Thief travels UP to Pune Burglary) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या (Pune Police arrested thief) ठोकल्या आहेत. हे अट्टल चोर चोरी करण्यासाठी विमानाने पुण्यात यायचे आणि चोरी झाल्यानंतर त्यांच्यातील एकजण चोरीचा सारा मुद्देमाल घेऊन ट्रॅव्हल्सने उत्तर प्रदेशला परत जायचा. परवेज शेख मोहम्मद खान आणि तस्लिम अरीफ समशूल खान अशी अटक केलेल्या दोन चोरांची नावे आहेत.

पुणे शहरात मोठया प्रमाणात होणाऱ्या घरफोड्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिल्या होत्या. यातुनच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला आंतरराज्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार पाळत ठेवून पुण्यात घरफोडी करत असल्याची माहिती मिळाली होती.

सोन्याचे दागिने चोरले
आणि त्यातच या टोळीतील दोनजण लोहगाव येथे थांबले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एका पथकाला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचत पोलीसांनी या दोघांना अटक केली आहे. अटक केल्यानंतर चौकशी करताना आरोपींनी पुण्यातली विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी चोरी केल्याची कबुली दिली. या चोरीतील १३० ग्रॅम सोन्याचे दागिने पोलीसांनी जप्त केले असुन त्यांची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा - RTI Activist Arrested For Demand Extortion : 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी आरटीआय कार्यकर्त्यास अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.