ETV Bharat / city

पिस्टल विक्री करणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश, 11 पिस्टलसह 31 काडतुसे जप्त - पिस्टल विक्री टाेळी स्वारगेट पाेलीस ठाणे

पिस्टल विक्री करणाऱ्या एका टाेळीचा पर्दाफाश करून चार लाख 55 हजार रुपये किंमतीचे एकूण 11 पिस्टल आणि 31 काडतुसे जप्त केले आहेत. याप्रकरणी बारक्या उर्फ प्रमाेद पारसे, राजू जाधव (वय 20), बल्लुसिंग शिकलीगर, लादेन ऊर्फ साेहेल माेदीन आसंगी आणि संदीप धुमाळ या आराेपींना अटक केली.

पुणे
पुणे
author img

By

Published : Nov 13, 2020, 8:10 PM IST

पुणे - पाेलिसांच्या स्वारगेट पाेलीस ठाण्याच्या पथकाने पिस्टल विक्री करणाऱ्या एका टाेळीचा पर्दाफाश करून चार लाख 55 हजार रुपये किंमतीचे एकूण 11 पिस्टल आणि 31 काडतुसे जप्त केले आहेत. याप्रकरणी बारक्या उर्फ प्रमाेद पारसे, राजू जाधव (वय 20), बल्लुसिंग शिकलीगर, लादेन ऊर्फ साेहेल माेदीन आसंगी आणि संदीप धुमाळ या आराेपींना अटक केली. परिमंडळ दाेनचे पाेलीस उपआयुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पिस्टल विक्री करणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश

दाेन गावठी पिस्टल व चार काडतुसे सापडली

स्वारगेट पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांचे पथक स्वारगेट पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, वानवडी पाेलीस ठाण्याला आर्म्स अ‌ॅक्टचा गुन्हा दाखल असलेला आराेपी प्रमाेद पारसे हा स्वारगेट येथे मित्राची वाट पाहत थांबलेला आहे. त्यानुसार पाेलीस पथक जाऊन त्यांनी त्याचा शाेध घेऊन त्यास ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे दाेन गावठी पिस्टल व चार काडतुसे सापडली. त्याच्याकडे सखाेल चाैकशी केली असता त्याने सांगितले की, त्याचा साथीदार राजू जाधव याचे साेबतीने बुलढाणा येथे जाऊन त्यांनी बल्लुसिंग शिकलीगार याचेकडून एकूण 13 गावठी पिस्टल व काडतुसे विकत आणली आहे. त्यावरून पाेलिसांनी राजू जाधव याचा शाेध घेऊन त्यास अटक केली व त्याच्या ताब्यातून पाच पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त केली.

प्रमाेद पारसे आणि राजू जाधव यांनी त्यांचे ओळखीचा लादेन आसंगी यास चार गावठी पिस्टल विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार आसंगी यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन पिस्टल व आठ काडतुसे जप्त केली आहेत. त्याने एक पिस्टल वेल्हा तालुक्यातील संदीप धुमाळ यास विक्री केल्याचे सांगितल्याने धुमाळ याचा शाेध घेऊन त्यालाही अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे पाेलिसांनी संबंधित आराेपींच्या ताब्यातून चार लाख 55 हजार रुपये किंमतीची एकूण 11 पिस्टल व 31 काडतुसे जप्त केली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.