ETV Bharat / city

नक्षलवाद्यांच्या पत्राला महत्व देण्याची गरज नाही - गृहमंत्री वळसे पाटील - letter of Naxalites

नक्षली चळवळ ही व्यवस्थेच्या विरोधात असलेली चळवळ आहे. मराठा आरक्षणावरून नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या पत्राकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

Home Minister dilip Walse Patil
गृहमंत्री वळसे पाटील
author img

By

Published : Jun 15, 2021, 4:53 PM IST

Updated : Jun 15, 2021, 5:33 PM IST

पुणे - नक्षली चळवळ ही व्यवस्थेच्या विरोधात असलेली चळवळ आहे. मराठा आरक्षणावरून नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या पत्राकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. व्यवस्थेच्या विरोधात काम करत असलेल्यांनी इतर लोकांना तुम्ही आमच्यात या आणि संघर्ष करा असे सांगणे हे देशाला एकप्रकारे आव्हानच किंवा धोकाच आहे, असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

माहिती देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

नक्षलवाद्यांच्या पत्राला महत्व देऊ नका -

मंगळवारी पुण्यातल्या मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या बैठकीसाठी वळसे पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांच्या या कृतीचा जास्त विचार करायची गरज नाही, बाकी आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये राज्यघटना, सरकार, न्यायालये यांच्या माध्यमातून सगळे प्रश्न सोडवले जात आहेत. लोकशाही मार्गाने होणारे आंदोलनं, मोर्चे तसेच चर्चेतून प्रश्न सुटत असतात, त्यामुळे नक्षलवाद्यांच्या या पत्राला महत्व देऊ इच्छित नाही, असे गृहमंत्री वळसे पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान, या निमित्ताने अर्बन नक्षलवाद डोके वर काढतोय का? असे विचारले असता, तसे वाटत नाही, नक्षलवाद्यांनी मराठा समाजाला केलेले हे आवाहन एक सर्वसाधारण आवाहन आहे, त्याला कोणी प्रतिसाद देईल असे वाटत नाही, असे वळसे पाटील म्हणाले.

समाज माध्यमांचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढले -

आजकाल समाज माध्यमांचा गैरवापर करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात काही पक्ष, काही संघटना या जाणीवपूर्वक त्यांची ट्रोल आर्मी तयार करून वेगवेगळ्या लोकांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा प्रकरणात पोलीस सायबर कायद्याअंतर्गत कारवाई करणारच, असे गृहमंत्री यावेळी म्हणाले. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी झालेल्या कारवाईबाबत बोलताना गृहमंत्र्यांनी हे भाष्य केले.

Last Updated : Jun 15, 2021, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.