पुणे - गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुणे शहरात देखील मुसळधार पाऊस होत आहेत. अनेक सोसायटी तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याचे चित्र शहरातील विविध भागांमध्ये पाहायला मिळत आहे. ( Heavy Rain In Pune ) पुण्यातील कोंढवा बुद्रुक गावठाण, दत्त मंदिरासमोर आज गुरूवार (दि. 14 जुलै)रोजी वाड्याची भिंत बाजूच्या घरावर पडल्याने इतर तीन घरातील ११ रहिवाश्यांना अग्निशामक दलाच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात आल आहे. ( Rain In Pune ) या घटनेत कोणीही जखमी व जिवितहानी झालेली नाही.
घरावर वाड्याची भिंत कोसळली - आज सकाळी ही घटना घडली असून ज्या वाड्याची भिंत कोसळली आहे. त्या वाड्यात सुदैवाने कोणीही राहायला नव्हते. पण ज्या दिशेने वाड्याची भिंत कोसळली त्या तिन्ही घरातील 11 जण हे घरातच अडकून बसलेले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटना स्थळी जाऊन त्या 11 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. यात ज्या घरावर वाड्याची भिंत कोसळली त्या घराची भिंत पडली असून त्याचबरोबर घरावरील पत्रा देखील तुटला आहे.
पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे खड्डे भरण्याची काम - शहरांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे शहरातील बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. शहरातील मुख्य टिळक रस्त्यावर दोन ठिकाणी रस्ता पुर्णपणे उखडला आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे खड्डे भरण्याची काम महानगरपालिकडून करणे आवश्यक होते. हे झाले नसल्याने पुणे शहरातल्या सगळ्यात रस्त्यावरती खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. या घटनेमुळे नागरिकांना प्रचंड ट्रॅफिकचा सामना कारावा लागत आहे.
हेही वाचा - Heavy Rain In Pune: पावसामुळे रस्ते उखडले! ठेकेदाराकडून निकृष्ट काम; कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी