पुणे - सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा मार्ग आजपासून मोकळा झाला आहे. पुण्यात महापालिकेच्या रुग्णालयात ही लस घेण्यासाठी नागरिकांनी आज मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 ते 49 वर्षे वयोगटातील विशिष्ट आजार झालेल्या नागरिकांना आजपासून कोविडची लस देण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ही लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
याआधी पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना तर दुसऱ्या टप्प्यात कोरोना काळात रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली. त्यानंतर आजपासून कोविड लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झालाय. या टप्प्यात सात वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आणि 45 ते 49 वर्षे वयोगटातील विशिष्ट आजार झालेल्या लोकांना ही लस देण्यात येत आहे.
कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यास सुरुवात, लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी - कोरोना लसीकरण
पुण्यात महापालिकेच्या रुग्णालयात ही लस घेण्यासाठी नागरिकांनी आज मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 ते 49 वर्षे वयोगटातील विशिष्ट आजार झालेल्या नागरिकांना आजपासून कोविडची लस देण्यात येत आहे.