पुणे - मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही कोरोना ( Coronavirus) रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. एकंदरीत राज्यातच कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ ( Coronavirus In Maharashtra ) पाहायला मिळत आहे. बुधवारी पुण्यातील ( Pune Corona ) कोरोना रुग्णांचा आकडा २३२ वर पोहोचला होता. या महिन्यातील ही सर्वाधिक रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे. त्यासोबतच राज्यात ओमायक्रॉनचा धोकाही वाढत आहे. यामुळे वाढती रुग्ण संख्या ही प्रशासन आणि आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
शहरात दिवसंदिवस वाढत आहे रुग्णसंख्या
पुणे शहरात दिवसंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. शहरात गेल्या काही महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. दरोरोज 50 ते 70 असे रुग्ण आढळून येत होते. मात्र वाढत जाणारी गर्दी, नागरिकांकडून होणार नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचा धोका तर दुसरीकडे दिवसंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात आज 232 पॉझिटिव्ह रुग्ण
शहरात आज सर्वाधिक 232 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात 83 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्याबाहेरील 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात सध्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 1218 इतकी झाली असून 90 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहे.
Pune Corona : पुणे शहरात कोरोनाचे दुप्पट रुग्ण, बुधवारी झाली महिन्याभरातील सर्वाधिक बाधितांची नोंद - Pune Corona News
पुणे शहरात वाढणारी गर्दी आणि कोविड प्रतिबंधक नियमांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे शहरात कोरोना रुग्ण संख्यात वाढ दिसून येत आहे. शहरात महिन्याभरातील सर्वाधिक रुग्ण संख्या बुधवारी नोंदवली गेली आहे. पुण्यात बुधवारी २३२ रुग्णांची नोंद झाली आहे.