पुणे - शहरातील मध्यवर्ती नानापेठेतील नवा वाडा भागात पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून एका तरुणाची मध्यरात्री चाकूने भोसकून आणि डोक्यात सिमेंटचे ब्लॉक घालून निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. यामध्ये अक्षय लक्ष्मण वल्लाळ (वय २८, रा. नवा वाडा, नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचे आत्ता सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. यात भयानक पद्धतीने वल्लाळ याच्यावर वार करण्यात आले आहेत.
सिमेंट कॉक्रीटचा दगड घालून त्याचा खून केला - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय वल्लाळ याची समाजात चांगली असल्याने महेश बुरा व किशोर शिंदे यांच्यात पूर्वीपासून वाद होता. नवा वाडा येथील लाँड्रीच्या समोर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व अक्षय वल्लाळ हे थांबले असताना, महेश बुरा व किशोर शिंदे तेथे आले. त्यांनी पूर्ववैमनस्यातून अक्षयवर कोयत्याने वार करुन व डोक्यात सिमेंट कॉक्रीटचा दगड घालून त्याचा खून केला आहे. त्याला वाचवण्यासाठी अतुल गेला असताना महेश बुरा याने त्यांच्याही डोक्यात कोयत्याने वार करुन, गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक उल्हास कदम अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा - गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा; युवकांवर दाखल झालेले 'ते' गुन्हे मागे घेणार