ETV Bharat / city

'कोरोना लसीकरणानंतरही जीवनावश्यक गरज राहणार 'मास्क'.. व्हॅक्सिनने केवळ 95 टक्के प्रतिकारशक्ती ' - कोरोना लसीकरणानंतरही मास्क वापरावा लागणार

कोरोनावरील लस घेतली तरी कपड्यांप्रमाणे 'मास्क' हे जीवनावश्यक घटक राहणार असून आयुष्यातून जाऊ शकत नाहीत, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमधील वस्त्र या गरजेत आता 'मास्क'चा समावेश करणे अनिवार्य झाले आहे.

mask' will be essential even after corona vaccination
लसीकरणानंतरही जीवनावश्यक गरज राहणार 'मास्क
author img

By

Published : Dec 21, 2020, 7:10 PM IST

Updated : Dec 22, 2020, 5:20 PM IST

पुणे - कोरोनावरील लस घेतली तरी कपड्यांप्रमाणे 'मास्क' हे जीवनावश्यक घटक राहणार असून आयुष्यातून जाऊ शकत नाहीत, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमधील वस्त्र या गरजेत आता 'मास्क'चा समावेश करणे अनिवार्य झाले आहे. लस घेतल्यानंतरही मास्क का घालावा लागेल यामागे काय कारण आहे, हे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी सांगितलं आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर 50 टक्के प्रतिकार शक्ती वाढते -

कोरोनाची लस ही दोन टप्प्यात मिळणार असून यामध्ये सुरवातीला पहिली लस देण्यात येणार आहे आणि त्यानंतर 3 आठवड्यानंतर दुसरी लस देण्यात येणार आहे. पहिली लस घेतल्यानंतर सुरवातीला फक्त 50 टक्केच प्रतिकारशक्ती निर्माण होणार आहे. त्यानंतर दुसरी लस घेतल्यानंतरच 50 टक्के प्रतिकारशक्ती वाढून 95 टक्के होणार आहे. त्यामुळे करोनाची लस घेतली याचा अर्थ कोरोना व्हायरस गेला किंवा आपल्याला याची लागण होणार नाही, असा होत नाही. कोरोनापासून जी लागण होईल, त्याची तीव्रता कमी होईल, हा त्यामागचा अर्थ आहे. त्यामुळे हा व्हायरस शरीरात प्रवेश करू नये, यासाठी ज्या उपाययोजना सांगितल्या आहेत, त्या अंगीकारायच्या आहेतच.

कोरोना लसीकरणानंतरही जीवनावश्यक गरज राहणार 'मास्क'
लस घेतल्यानंतर 95 टक्के प्रतिकारशक्ती निर्माण होणार - कोरोनाच्या दोन्ही लस दिल्यानंतरही 95 टक्के प्रतिकारशक्ती तयार होते 5 टक्के होत नाही. याचाच अर्थ असा की 100 लोकांमध्ये 95 लोकांमध्ये प्रतिकारशक्ती तयार होते. 5 लोकांमध्ये होत नाही. त्यामुळे दोन्ही लस घेतल्यानंतरही पूर्णपणे प्रतिकारशक्ती तयार होत नाही. म्हणून आपल्याला लस घेतल्यानंतरही कोरोनाच्या नियमांच पालन करावं लागणार आहे, अशी माहिती डॉ.अविनाश भोंडवे यांनी दिली.इतर आजाराच्या बचावासाठी 'मास्क'च वापरावा लागणार - केवळ कोरोनाच नाही, तर रोज उत्पन्न होणारे अनेक व्हायरस, बॅक्टेरीया हे हवेच्या, स्पर्शाच्या किंवा अन्य माध्यमातून आपल्या संपर्कात, शरीरात प्रवेश करत असतात. त्यातील काही कोरोनापेक्षाही जास्त घातक असतात. त्या सगळ्यांपासून मास्क तसेच हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग या गोष्टींमुळे बचाव होतो, ही वस्तुस्थिती आहे. कोरोना रोखण्यासाठी टप्प्याटप्प्याने लसीकरण होणार आहे. त्यामुळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत ते होईपर्यंत धोका नाही, असे म्हणता येणार नाही. परंतु मुळातच कोरोना एकच विषय नव्हे, तर सीझनल फ्लू, स्वाइन फ्लू, क्षयरोग आणि अन्य श्वास, थुकीसंदर्भातील रोग अस्तित्वात आहेतच. त्यामुळे त्यापासून बचावासाठी 'मास्क'च वापरावा लागणार आहे.

Last Updated : Dec 22, 2020, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.